आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा तालुक्यात झोपडीला लागलेल्या आगीत बालकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा - तालुक्यामधील जिराळी शिवारातील एका शेतमजुराच्या झोपडीला लागलेल्या आगीत दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

शिरपूर तालुक्यातील निशाण वाणी येथील वाघर्‍या पवार हा येथे शेतमजूर म्हणून आला आहे. रविवारी दोघे पती पत्नी कामासाठी शेतावर निघून गेल्यानंतर झोपडीत पाच वर्षांची मुलगी, अडीच वर्षे व दीड वर्षे वयाची मुले खेळण्यासाठी ते घरी सोडून गेले होते. सकाळी स्वयंपाक केल्यानंतर चुलीतील विस्तव जळत होता. हवेमुळे हा विस्तव उडून झोपडीवर पडला. यात झोपडीला अचानक आग लागल्याने त्यांची दोन्ही मुले घाबरून बाहेर पडली तर दीड वर्षीय मुलगा रितेश वाघर्‍या पवार झोळीत झोपल्याने आगीच्या रौद्ररूपात सापडून त्याचा मृत्यू झाला आहे.