आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेटी बचाव, पाणी बचाव'चा संदेश देत दांपत्याचा दुचाकीवरुन 29 राज्यांत प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- केवळ दुचाकीसारखे वाहन अन् अनाेळखी ठरणाऱ्या २९ राज्यांमधील प्रवासाचा धाेका पत्करत पुण्यातील डाॅक्टर दांपत्याने तब्बल २० हजार किलाेमीटरचे अंतर कापले. यात बेटी बचाव अन् पाणी बचावचा संदेश दिला. या दाेन समस्या देशभरात माेठ्या प्रमाणात वाढल्या अाहेत, असे मत डॉ. विजय चौधरी व त्यांच्या पत्नी वैशाली चौधरी यांनी व्यक्त केले. पुण्यापासून त्यांनी मोटारसायकलीवर भ्रमण करायला प्रारंभ केला. २० हजार किलोमीटरचा प्रवास करीत ते शनिवारी शहरात पाेहचले. महापालिकेत त्यांचे स्वागत करण्यात आले.  

दुचाकीवर २९ राज्यात प्रवास केल्यानंतर डाॅ. विजय चौधरी यांनी त्यांचे अनुभव व उद्देश सांगितला. ते म्हणाले की, मुलींचे कमी होणारे प्रमाण पाहता ‘बेटी बचाव बेटी पढाव’ बाबत जागृतीची गरज आहे. पाणी वाचविण्याचाही संदेशही सध्या देत अाहाेत. दि. ६ फेब्रुवारीला पुणे येथून देशभ्रमणाला सुरुवात  केली. आतापर्यंत २० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. 

यादरम्यान २९ राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशातून प्रवास केला. माणुसकीचा प्रत्यय सर्वच ठिकाणी आला. विविध भाषा, संस्कृती, चालीरिती व खानपान पद्धती वेगळ्या असल्या तरी देश एका सूत्राने बांधलेला अाहे. भ्रमंती दरम्यान दररोज २०० ते ३०० किलोमीटरचा प्रवास हाेताे. भाषेची फारशी अडचण जाणवली नाही. सर्वत्र हिंदी भाषा समजते. यात केवळ केरळात भाषेची अडचण अाली.  त्याप्रमाणे पूर्वेकडील राज्यातही चांगला अनुभव आला. मात्र तेथील रस्ते खडतर असल्याने शंभर किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १३ तास लागल्याचे त्यांनी सांगितले.  

दारूच्या दुकानावर मिळाले गरम पाणी
राजस्थानात जैसलमेर ते बाडमेरदरम्यान कोणत्याही ठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. या रस्त्यादरम्यान केवळ एक देशी दारूचे दुकान दिसले. त्या ठिकाणी पाण्याची मागणी केल्यावर गरम पाणी िपण्यासाठी मिळाले, असा अनुभवही त्यांनी सांगितला.
बातम्या आणखी आहेत...