आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Day Before Love Marriage Girl Died In Accident

जळगाव: विवाहाच्या पूर्वसंध्येला प्रेयसीचे अपघाती निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दोघांचे एकमेकांवर प्रेम होते... दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता...त्यासाठी घरून पोबाराही केला होता...विवाहाच्या आदल्या दिवशी जळगावी येण्यास निघाले होते...परंतु विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच प्रेयसीचे अपघाती निधन झाले.

नशिराबाद येथील रहिवासी सध्या पाचोरा येथे शिक्षक असलेला युवक दीपक चंद्रकांत महाजन पाचोरा तालुक्यातील तारखेड येथील युवती रेखा राजेंद्र शिंपी (वय 22) यांचे प्रेम होते. ते दोघे आठ दिवसांपूर्वी पाचो-याहून नाशिक येथे पळून गेले होते. याबाबत पाचोरा पोलिसात मुलीचे वडील राजेंद्र शिंपी यांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले होते. सोमवारी या दोघांचे जिल्हाधिकारी कार्यालयात रजिस्टर पद्धतीने लग्न होणार होते. याबाबतची तारीखही निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी रविवारी नाशिकहून दुचाकी (क्रमांक एमएच 19 बीएस 6044) ने जळगावकडे येत होते.
या वेळी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील एकलग्न गावाजवळ त्याच्या वाहनाला गॅस टँकरने (क्रमांक 6163) ने मागून धडक दिली. यात रेखाचा मृत्यू झाला तर दिपक महाजन हा किरकोळ जखमी झाला आहे. पाळधी पोलिसांनी त्यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक बी. डी. ढुमणे करीत आहे.