आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अंक जादा पडल्यामुळे कोटीचा वाळू ठेका 19 कोटींवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : तालुक्यातील फुपनगरी वाळू गटाच्या ई-लिलावात एका अंकाने कमाल झाली. प्रशासनास अारक्षित किमतीपेक्षा तब्बल १९ काेटी रुपये अधिक मिळाले. ठेकेदाराच्या लक्षात चूक येताच त्याने चुकून एक अंक जास्त पडल्याची भूमिका घेतली. मात्र, प्रशासनाने पूर्ण रक्कम भरावीच लागेल, अशी भूमिका घेतली अाहे. अन्यथा ठेकेदाराची अनामत जमा करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात येणार अाहे. 
 
तालुक्यातील फुपनगरी या वाळू गटाची -लिलाव प्रक्रिया शनिवारी राबवण्यात आली. या गटासाठी प्रशासनाने कोटी १० लाख १८ हजार ३८१ रुपये अारक्षित किमत निश्चित केली होती.
 
या -लिलाव प्रक्रियेत व्ही.के.इंटरप्रायजेसतर्फे विलास यशवंते, धनराज घुले आणि श्री सिद्धिविनायक इंटरप्रायजेसतर्फे राहुल तिवारी या ठेकेदारांनी भाग घेतला. विलास यशवंते यांनी या वाळू गटासाठी कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांची बोली लावली. धनराज घुले यांनी कोटी २७ लाख १८ हजार ३८१ रुपयांची वरचढ बोली लावली. तर राहुल तिवारी यांनी अारक्षित किमतीच्या २० पट १९ कोटी ९९ लाख ३८ हजार३८१ रुपयांची बोली लावली. 
 
एका अंकाने ठेकेदार अडचणीत 
ई-लिलाव प्रक्रियेत नजरचुकीने एक अंक जास्त पडला. या लिलावासाठी इतकी माेठी बोली लावली नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. याबाबत तडजोड करण्यासाठी ठेकेदाराने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी बोली लावलेली रक्कम भरावीच लागेल,अशी भूमिका घेतली आहे.
 
सर्व गटांच्या लिलावांची रक्कम एकाच गटातून 
गेल्या वर्षी सर्व जिल्ह्यातील सर्व वाळू गटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला १६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, यंदा फुपनगरी भाग या एकमेव गटातून पावणे वीस कोटी रुपयांची रक्कम प्रशासनाला मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३ वाळू गटांचा लिलाव झालेला आहे. 
 
तर ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करणार 
- ठेकेदाराने फुपनगरी वाळू गटासाठी १९ कोटी ९९ लाख ३८ हजार ३८१ रुपयांची बोली लावली आहे. त्यांनी लिलावाची रक्कम भरल्यास त्यांची प्रशासनकडे असलेली अनामत रक्कम २२ लाख हजार ६७६ रुपये जप्त करण्यात येईल. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल.
राहुल मुंडके, प्रभारी अपर जिल्हाधिकारी 
 
बातम्या आणखी आहेत...