आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेत ‘अंगठा’ टेकवून निवृत्त कर्मचाऱ्याला 10 हजारांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सतरामजलीतील अलाहाबाद बँकेच्या शाखेतून महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यामधून स्वाक्षरी एेवजी अंगठा टेकवून १० हजार रुपये लांबवल्याची घटना उघडकीस अाली अाहे. झालेली चूक लक्षात येताच बँँकेनेही पैसे परत करण्याची तयारी दाखवत पाचव्या दिवशी खात्यात रक्कम जमा केली. पासबुक स्वाक्षरी तपासता परस्पर पैसे विड्रॉल करण्याच्या या प्रकारामुळे बँकेतील कारभाराबद्दल अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. 

नगरपालिका असताना दशरथ कृष्णा पाटील (रा.रामनगर, वाघनगर जवळ) हे वॉचमन म्हणून कार्यरत हाेते. ते १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाले अाहेत. गेल्या काही वर्षांपासून ते चालता येत नसल्याने पलंगावर असतात. त्यामुळे पेंशनची रक्कम घेण्यासाठी ते सतरा मजली इमारतीतील अलाहाबाद शाखेत येता एटीएमचा वापर करतात. दशरथ पाटील यांना पैशांची गरज असल्याने जानेवारी राेजी त्यांची पत्नी नातू एटीएमवर गेले असता चार हजार रुपये निघत नव्हते. त्यामुळे दशरथ पाटील यांचा मुलगा मनपा कर्मचारी विनाेद पाटील हे पासबुक घेऊन अलाहाबाद बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक भरून घेतले असता, त्यांच्या खात्यातून १९ डिसेंबर २०१६ राेजी १० हजार रुपये विड्रॉल केल्याचे लक्षात अाले. परंतु बँकेत येऊन पैसे काढलेले नसताना विड्रॉल कसे झाले हा प्रश्न पडल्याने विनाेद पाटील यांनी विड्रॉल स्लिप तपासली असता त्यावर अंगठा लावून पैसे काढल्याचे लक्षात अाले. वास्तविक खातेदार दशरथ पाटील हे बँकेतून पैसे काढायचे असल्यास इंग्रजीत स्वाक्षरी करीत असताना अंगठा टेकवून पैसे काढण्यात अाल्याने संशय बळावला. त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात अाणून दिल्यानंतर हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगितले. 

घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील दाेन दिवस प्रतीक्षा करा पैसे परत जमा हाेतील, असे अाश्वासित केले. परंतु पाच दिवस उलटूनही पैसे जमा झाल्याने ते बुधवारी पुन्हा बँकेत गेले असता शाखा व्यवस्थापक एम. टी. फुलगेकर रजेवर असल्याचे सांगण्यात अाले. मात्र, दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १० हजार रुपये त्यांच्या वडिलांच्या खात्यात जमा करण्यात अाले हाेते. 

बँकेचा सावळा गोंधळ 
महापालिकेच्यासतरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अलाहाबाद बँकेची शाखा अाहे. या शाखेत पालिकेशी निगडीत सर्व व्यवहार हाेत असतात. यात पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील याच शाखेतून अदा केले जाते. बहुसंख्य कर्मचारी हे निवृत्त हाेऊन अनेक वर्षे झाली असून काही कर्मचारी हे अशिक्षित असल्याने अंगठा देऊन व्यवहार करतात. परंतु स्वाक्षरी करणाऱ्या खातेदाराच्या खात्यातून देखील अशा पद्धतीने अंगठा टेकवून पैसे विड्रॉल झाल्याने बँकेचे अधिकारी, कर्मचारी नेमके तपासतात की नाही? तसेच बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात काही हात तर नाही ना? असा प्रश्न खातेदार दशरथ पाटील यांचे पुत्र विनोद पाटील यांनी उपस्थित केला अाहे. 

बँक कारवाई करणार का? 
घडलेल्याप्रकाराबाबत बँकेत चाैकशी केली असता बँकेचे व्यवस्थापक एम. टी. फुलगेकर रजेवर असल्याचे सांगण्यात अाले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत बाेलताना कर्मचाऱ्यांनी पैसे काढणाऱ्याचा शाेध लागला असून ताे पैसे परत करायला तयार असल्याचे तसेच खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे बुधवारी दुपारी वाजता सांगितले. त्यानंतर त्यांनी पैसे जमा केले असले तरी दशरथ पाटील यांच्या विड्राॅल स्लिपवर अंगठा टेकवणारा स्लिपच्या पाठीमागे दस्तुर म्हणून अातिष हंसकर नाव असलेला व्यक्ती काेण अाहे? तसेच त्याच्याविरुद्ध बंॅक कारवाई करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे.