आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दुकाने, घराला अाग, साडेतीन लाखांचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील पापानगरात दोन दुकानांसह एका घराला अचानक आग लागली. अग्निशमन दलाचा बंब तब्बल तासभर उशिराने पाेहाेचल्याने साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पापानगरात निदा स्वीट्स, अाशा स्क्रीन प्रिंटर्स या दुकानांना एजाज अली यांच्या घराला अाग लागल्याने किमती साहित्याचा काेळसा झाला. धुराचे लाेट दिसताच परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली. मात्र, दगडी पुलाखालील वाहतुकीचा मार्ग बंद असल्याने यावल राेडवरील जलशुद्धीकरण केंद्रातून निघालेला अग्निशमन बंब कोनार्क हॉॅस्पिटल, जळगाव रोड, नाहाटा चौफुलीमार्गे घटनास्थळी पाेहाेचेपर्यंत तासाभराचा कालावधी लाेटला गेला. ताेपर्यंत अागीने राैद्ररूप धारण केल्याने दाेन्ही दुकाने एका घरातील संसाराेपयाेगी साहित्य खाक झाले. तत्पूर्वी नागरिकांनी नजीकच्या हातपंपावरील पाण्याचा उपसा करून अाग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश अाले नाही. आगीत शेख शाहीद शेख शब्बीर यांचे लाख ,राजेंद्र पाटील यांचे ७० हजार आणि एजाज अली लाख असे एकूण तीन लाख ७० हजार रुपयांचे नुकसानीचा पंचनामा महसूलने केला अाहे.

अग्निशमनबंब जामनेर रोडवर हवा
पालिकेचेअग्निशमन बंब उत्तर भागातील जलशुद्धीकरण केंद्रावर उभे केले जातात. मात्र, दक्षिणेकडील भागात आग लागताच या बंबांना दगडी पुलाकडून जावे लागते. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना विलंब होत आहे. दुर्घटना घडली मदत मिळण्यासाठी पालिकेचा एक बंब हॉटेल रंगोलीच्या पाठीमागील अग्निशमन बंबाच्या जागेवर तैनात ठेवावा, असा मुद्दा पुढे अाला अाहे.

दुकानातच हाेता मुक्काम : आशास्क्रीन प्रिंटर्सचे मालक राजेंद्र पाटील यांनी कानातच मुक्काम ठोकला होता. मात्र, त्यांना गाढ झाेप लागल्याने आग लागल्याची जाणीव झाली नाही. त्यांच्या दुकानालगतचे एजाज अली यांनी शेजारधर्म म्हणून त्यांना जागे केले. ते दुकानातून बाहेर पडताच दाेन मिनिटांत अागीने राैद्ररूप धारण केले.
महिनाभरातदुसरी घटना : दिवाळीच्यारात्री मॉडर्न रोडवरील तीन दुकानांना आग लागली होती. त्यात तब्बल १३ लाख ३० हजार रुपये नुकसान झाले हाेते. गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा अकस्मात अाग लागल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे.
पापानगरात लागलेल्या अागीत दुकानांचे झालेले नुकसान.
बातम्या आणखी आहेत...