आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकारी होण्यासाठी तरुणीने सोडले घर, २९ एप्रिल रोजी विवाहाचा मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पाेलिस अधिकारी हाेऊन नाव कमवायचे, असे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या १६ वर्षीय तरुणीचे पालकांनी अचानक लग्न ठरवले. लग्नाला विराेध करूनही पालक एेकून घेत नसल्याने अखेर ३० मार्चला हताश झालेल्या तरुणीने घर साेडले. मंगळवारी रात्री ८.३० वाजता जळगाव बसस्थानक परिसरात रडत बसलेल्या या तरुणीची विचारपूस करून एका सदगृहस्थाने तिला घरी अाणले. तिची समजूत काढून बुधवारी तिला एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अाणले. पाेलिसांनी बुधवारी मध्यरात्री या तरुणीला पालकांच्या स्वाधीन केले.
सोलापूर तालुक्यातील बार्शी येथे अाजी-अाजाेबांसह राहणाऱ्या १६ वर्षीय वैशाली (नाव बदललेले) हिची ही कहाणी आहे. तिचे आई-वडील पिंपरी-चिंचवड येथे राहतात. वडील खासगी वाहनचालक असून त्यांची परिस्थिती बेताची आहे. वैशालीचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण आजी-आजोबांकडे बार्शी येथे झाले. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली अाहे. सुट्यांमध्ये ती पिंपरी-चिंचवडला आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली. पालकांनी तिचा विवाह पुण्यातच राहणाऱ्या एका मुलाशी निश्चित केला. एवढेच नव्हे तर २९ एप्रिल रोजी तिच्या लग्नाची तारीखदेखील निश्चित केली. त्यानंतर घरात लग्नाची तयारी सुरू हाेऊन पत्रिका वाटपाचे काम देखील सुरू झाले. मात्र, वैशालीला लग्न करायचे नव्हते. आपल्या नातेवाइकांत कोणीच उच्चशिक्षित नाही. त्यामुळे आपण शिकायचे, पोलिस अधिकारी बनायचे हे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तिचा प्रवास... चोरट्याला बदडून मिळवला मोबाइल
- आला होता आत्महत्या करण्याचा विचार
बातम्या आणखी आहेत...