आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बसमधील उकळते पाणी उडल्याने विद्यार्थी भाजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्कूल बसमधील रेडिएटरचे उकळते पाणी अंगावर पडल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना बुधवारी घडली. स्कूलबसचा चालक मद्यधुंद अवस्थेत हाेता. संतप्त पालकांनी चालकाला चाेप दिल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

पलाेड पब्लिक स्कूलमधील काही विद्यार्थी दरराेज खासगी बसमधून शाळेत जातात. या गाडीवर अनिस पटेल हा चालक अाहे. गाडीच्या डॅश बाेर्डजवळ रेडिएटरला पाण्याचा पुरवठा करणारी छाेटी प्लास्टिकची टाकी अाहे. पाणी जास्त गरम झाल्याने त्या टाकीचे झाकण उडून उकळते पाणी चालकाच्या बाजूला बसलेल्या यश साेनवणे (वय ८), केतकी बाेरसे (वय ७), राज पाटील (वय ८) या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडले. त्यांनी अारडाअाेरड केली. मात्र, चालक गाडी थांबवत नसल्याचे बघून राज याने अनिसच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे त्याने गाडी थांबवली. त्या वेळी अर्जुननगरातील पालक धावत अाल व त्यांनी मुलांना रुग्णालयात हलविले.