आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सचा फोटो काढण्याच्या संशयातून एकास पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सिव्हिलमध्ये रविवारी दुपारी वाजता महिला रुग्णाला भेटण्यासाठी एक तरुण अाला होता. त्या वेळी एका वृद्ध महिलेला फ‍िट अाल्याने परिचारिका तिच्यावर उपचार करत होती. त्याच वेळी तरुणाने माेबाइलमध्ये फाेटाे काढले. परिचारिकेचा फोटो काढत असल्याच्या संशयावरून त्याला पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात अाले.

एमआयडीसीतील उमेश पारधी (वय २८) हा रविवारी दुपारी वाजता मारहाणीत जखमी झालेल्या कविता बोरसे या रुग्णास भेटण्यासाठी आला होता. त्याच वेळी वाॅर्ड क्रमांक १२मधील एका वृद्ध महिलेला फ‍िट अाले. त्यामुळे त्या वृद्ध महिलेवर एक परिचारिका उपचार करत हाेती. त्याचवेळी उमेश हा परिचारिकेचा फाेटाे काढत असल्याचा संशयावरून त्याला पकडून जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात अाले अाहे. चौकशी दरम्यान पोलिसांनी उमेशचा माेबाइल तपासून त्याची सविस्तर माहिती घेतली. मात्र, ताे वृद्ध महिलेचे फाेटाे काढत असल्याचे सांगत हाेता.
बातम्या आणखी आहेत...