आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्यामुळे तरुणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप करून चारित्र्यावर संशय घेऊन दोघांनी एका युवकाला बुधवारी बेदम मारहाण केली हाेती. तसेच मारहाण केल्याचे मोबाइल रेकॉर्डिंगही केले. याचा धसका घेत संबंधित तरुणाने गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अात्महत्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. 
 
हिराशिवा काॅलनीत केदार सुभाष पाटील (वय २६) याचे परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी संबंध आहेत. तो त्या महिलेला दुचाकीने दुकानात सोडत असे, असा आरोप करीत परिसरातच राहणाऱ्या गजेंद्र न्हावी गौरव सोनवणे या दोघांनी केदारला बुधवारी रात्री ९ वाजता जुन्या हायवेजवळ शेतकी कॉलेज समोर नेऊन अंधारात बेदम मारहाण केली. त्या महिलेचा नांद सोड, ती आमची नातेवाईक आहे, असे दोघांनी केदारला सांगितले. तसेच मारहाण करीत असल्याचे रेकॉर्डिंग मोबाइलमध्ये केले. केदारकडून काही गोष्टी वदवूनही घेतल्या. या प्रकारामुळे हताश होऊन केदार घरी आला. 

भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या केदारला त्याचे वडील सुभाष आई शीला यांनी विचारपूस केली. असा शांत का बसला आहेस? असे विचारले. यावर केदारने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. गौरव गजेंद्र यांनी मारहाण करून मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केल्याची माहिती त्याने दिली. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार देण्याचा विचार केला; परंतु गजेंद्र गौरव यांनी पोलिसांना माहिती दिल्यास जीवे ठार मारू, असा दम केदारला दिला होता. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी तक्रार देणे टाळले. या घटनेमुळे केदार पूर्णपणे हताश झाला होता.आई-वडिलांना त्याची विवंचना कळत होती. त्यांनी केदारची समजूतही काढली होती. त्यानंतर गुरुवारी तो वडिलांसह शाहू कॉम्प्लेक्स येथे वेल्डिंगच्या कामाला गेला होता. दुपारी २ वाजता घरी येऊन तो झाेपला. 

तो अस्वस्थ असल्यामुळे सायंकाळी ५ वाजता आई-वडिलांनी पुन्हा त्याची समजूत काढली. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता आई-वडील स्वामी समर्थ मंदिरात आरतीसाठी गेले. त्यावेळी केदारने गुरुवारी सायंकाळी ७ वाजता बेडरूममध्ये साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मंदिरातून केदारचे अाई-वडिल घरी परतले. त्यावेळी घरचा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी मागच्या बाजूने जाऊन पाहिले असता, केदार गळफास घेतलेल्या अवस्थेत आई-वडिलांना दिसून आला. त्यांनी अारडा-आेरड केल्याने शेजारचे लोक जमले. त्यांनी दरवाजा तोडून केदारला खाली उतरवून रुग्णालयात नेले. याप्रकरणी केदारच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजेंद्र गौरव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील करीत आहेत. गजेंद्र गौरव हे बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, केदारचा मोठा भाऊ कामानिमित्त बाहेरगावीच राहतो. त्यामुळे केदार जळगावात एकटाच आई-वडिलांसाेबत राहत होता. या घटनेमुळे आई-वडिलांचा आधार हरपला आहे. 

खिशात सापडली चिठ्ठी 
केदारने गुरुवारी ७ रात्री वाजता आत्महत्या केली. त्यानंतर रात्री त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचा पंचनामा करीत असताना त्याच्या पॅण्टच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. यात ‘मी स्वत: ही चिठ्ठी लिहित आहे, काल मला जबरदस्ती मारून माझी रेकॉर्डिंग केली आहे. ती करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी,’ असे चिठ्ठीत लिहिलेले होते. चिठ्ठी मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला. 
 
पुढील स्लाइडवर पाहा केदार पाटीलने लिहिलेली चिठ्ठी...
बातम्या आणखी आहेत...