आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैविक कचऱ्यासाठी उभा राहणार प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. शहरातील कचऱ्याची समस्या फार मोठी आहे. दररोज शहरातून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. त्यात जैविक कचऱ्याची समस्या माेठी आहे. हा कचरा उघड्यावर टाकता येत नाही. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रकल्प उभारावा त्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी आयएमएतर्फे नुकतीच आयुुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्याकडे केली आहे.

शहरातील पायाभूत सुविधांमध्ये पाणीपुरवठा, कचरा निर्मूलन, रस्ते, सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी या सुविधा परिपूर्ण असल्यास शहराचे व्यवस्थापन चांगले समजण्यात येते. त्यामुळे नागरिकांनाही सुविधा मिळत असल्याचे समाधान लाभते. त्यातून शहर विकासाचा पुढील टप्पा गाठता येतो; परंतु शहरात अद्याप पायाभूत सुविधांसाठीच नागरिकांना वारंवार मागणी करावी लागत आहे. त्यात गटारी, रस्ते, पथदिवे आणि पाणीपुरवठा या सुविधा शहरात पुरेशा प्रमाणात नसल्याने नागरिकांची ही मागणी कायम आहे. त्यातही शहरात कचऱ्याची समस्या तीव्र अाहे. शहरातील स्वच्छता नियमित होत नसल्याने शहराला बकाल रूप प्राप्त झाले होते. मात्र, आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पदभार घेतल्यापासून शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत अाहे. यासाठी दररोज पहाटे स्वत: फिरून कामाची पाहणी करीत आहे. त्याचप्रमाणे विविध भागात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांनाही सहभागी करण्यात आले आहे. शहरातील सर्व कचरा गोळा करून तो वरखेडी रस्त्यावर असलेल्या महापालिकेच्या मैदानावर टाकण्यात येत आहे. त्यावर दुसरी कोणतीही प्रक्रिया सध्या करण्यात येत नाही. या कचऱ्याप्रमाणे शहरातील दवाखाने, हॉस्पिटलमधूनही दररोज कचरा निर्माण होतो. मात्र, तो कचरा जैविक घनकचरा प्रकारात मोडत असल्याने तो असा उघड्यावर नियमाप्रमाणे टाकता येत नाही. त्यासाठी तो गोळा करून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येेते. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रकल्प उभारावा लागतो. त्यात या कचऱ्याचे विघटन करण्यात येते. कारण ते आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरणाला घातक ठरू शकते. त्यासाठी सध्या शहरातील हॉस्पिटलमधून हा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणारी खासगी संस्था आहे. ती हे काम काही वर्षांपासून शहरात करत आहे. त्या संस्थेतर्फे एका बंद वाहनातून शहरातून दररोज हा जैविक कचरा गोळा करण्यात येताे. त्यासाठी हॉस्पिटलच्या खाटांप्रमाणे शुल्क वसूल करण्यात येत अाहे. मात्र आता शहरात महापालिका आयएमएतर्फे जैविक कचरा विघटन प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे आयएमएने महापालिका प्रशासनाला पत्र देऊन तशी मागणी केली आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता करून द्यावी, असेही म्हटले आहे. शहरात हा प्रकल्प महापालिकेच्या साहाय्याने चालवण्यात येईल. त्यावर आता प्राथमिक चर्चा झालेली आहे.

जैविक कचरा हा गंभीर प्रश्न
जैविककचऱ्यामध्ये साधारणपणे हॉस्पिटलमधून बाहेर पडणाऱ्या इंजेक्शन, गोळया, सलाइन, सिरींज, जैविक बाबींचा समावेश असतो. हा कचरा गुरांच्या पोटात गेल्यास त्यांना इजा होऊ शकते. शिवाय पशू-पक्ष्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या कचऱ्याची व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लागल्यास यापासून निर्माण होणारा धोका टळू शकेल. त्यामुळे याबाबत महापालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
केरळ प्रकल्पाची पाहणी
शहरातमहापालिका हद्दीत जैविक घनकचरा विघटन प्रकल्प उभारावा, अशी मागणी आयएमएतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली अाहे. त्यासाठी आयएमएचे सदस्य काही दिवसांत केरळ येथील आयएमएने राबवलेल्या प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेणार आहेत. त्यानंतर येथे त्या पद्धतीने महापालिकेच्या साह्याने तो करता येईल.
डॉ.रवीवानखेडे, हॉस्पिटल िवभाग राष्ट्रीय सचिव
३५० हाॅस्पिटल, २५०० खाटा
शहरातसाधारणपणे ३५० हॉस्पिटल दवाखाने आहेत. यामधून २५०० खाटांची व्यवस्था आहे. शहरात हाॅस्पिटलची संख्या वाढती आहे. त्याचप्रमाणे या हाॅस्पिटलमधून शस्त्रक्रियाही नित्य होतात. त्यामुळे दररोज वैद्यकीय साहित्य जैविक कचरा निर्माण होतो. त्यासाठी भविष्यातील गरज म्हणून याकडे लक्ष देणे आवश्यक अाहे. सध्या हा कचरा घेण्यासाठी खाटेप्रमाणे त्याची दर आकारणी करण्यात येत अाहे.

शहरात गांडूळ खत प्रकल्पाजवळील पर्यायी जागा
शहरातीलहॉस्पिटल, दवाखान्यातून दररोज निर्माण होणारा जैविक कचरा निर्मूलन ही मोठी समस्या आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, असे आयएमएने सुचविले आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी सांगितल्यावर गांडूळ खत प्रकल्पाची जागा त्यासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून सध्या ती विचाराधीन आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे जाईल. त्यामुळे साधारण कचऱ्यात हा कचरा मिसळून होणारे अपघात होणार नाहीत. त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लागेल.
बातम्या आणखी आहेत...