आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड; रोमियोला ११ दिवसांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या टारगट युवकाला न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी बुधवारी ११ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मुलींची, महिलांची छेड काढणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
नवीपेठेतील मद्रास बेकरीसमोर २१ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास विशाल ऊर्फ विकी नामदेव कोळी (वय १९, रा. दिनकरनगर) याने पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला अडवले होते. त्यानंतर त्याने ‘तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, नाही तर तुझ्या आई, वडिलांना मारून टाकेन’, अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून दोन्ही मुली घटनास्थळावरून पळून गेल्या होत्या. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणी पीडित मुलगी, तिची आई, मैत्रिण, प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक गणेश कोळी आणि तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दिलेल्या साक्षी ह्या महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारपक्षातर्फे अॅड. संभाजी जाधव यांनी तर आरोपीतर्फे अॅड. आरिफ अब्दुल्ला यांनी काम पाहिले.
या कायद्यांतर्गत शिक्षा
आरोपी विशाल कोळी याला २०१२ च्या बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यापासून संरक्षण कायद्याच्या कलम १२ प्रमाणे कारवाई झाली. त्याला ११ दिवसांची कैद आणि हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश अग्रवाल यांनी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...