आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांचा सराव करून घरी परतला अन् गळफास घेऊन केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एमबीए प्रथम वर्षात शिकणाऱ्या अासाेदा येथील दुर्गेश काेळी याने गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

गणेशोत्सवासाठी आसोदा येथील युवक दररोज रात्री ढोल-ताशांचा सराव करत होते. गुरुवारी रात्री दुर्गेश अनिल कोळी (वय २३) यानेही ढोल बडवण्याचा सराव केला. ढोल-ताशे वाजवल्यानंतर तो घरी गेला. शुक्रवारी घराच्या वरच्या मजल्यावर गेल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे सकाळी १०.४५ वाजता आढळून आले. 

दरम्यान, दुर्गेश याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्याचे वडील अनिल कोळी एलआयसी एजंट तर आई गृहिणी आहे. त्याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...