आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर पारखनगरातील तरुणाने संपवली जीवनयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दिवाळीनिमित्त अादल्या दिवशी घराची साफसफाईचे काम उरकून अन् दुसऱ्या दिवशी मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर पारखनगरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना रविवारी सकाळी वाजता उघडकीस अाली. तरुणाच्या अात्महत्येविषयी कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पाेलिस त्या दृष्टीने तपास करीत अाहे. तुषार ढाके असे मृत तरुणाचे नाव अाहे. 

तुषार लक्ष्मीकांत ढाके (वय ३५) हे गेल्या ११ वर्षांपासून जैन इरिगेशन कंपनीत टेक्निशियन पदावर नोकरीस हाेते. मूळचे ममुराबाद येथील रहिवासी असलेले तुषार हे शहरात पारखनगरात भाड्याच्या खोलीत पत्नी धनश्री, मुलगी हास्या (वय ७) मुलगा तनव (वय ५) यांच्या सोबत राहात होते. तुषार यांच्या आई ममुराबाद येथेच राहतात. शनिवारी सुटी असल्यामुळे तुषार यांनी दिवाळीनिमित्ताने घराची साफसफाई केली होती. रविवारी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या पत्नी कामानिमित्त मुलांसोबत घराबाहेर गेल्या होत्या. त्या सकाळी ९ वाजता घरी पोहोचल्या. त्या वेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर पती दरवाजा का उघडला नाही. म्हणून धनश्री यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिले तर तुषार यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आहे. हे दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी आरडा-आेरड करून शेजारच्यांना माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तुषार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तुषारला मृत घोषित केले. त्यानंतर दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अरुण पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, ढाके यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी विवेक बोढरे यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

लाडका मित्र गेल्यामुळे सहकाऱ्यांना दु:ख अनावर 
तुषार ढाके हे कंपनीत चांगल्या पदावर नोकरीस होते. सहकारी मित्रांचे ते लाडके होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता त्यांनी काही मित्रांना फोन करून त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दुपारी ४ वाजता ड्युटीवर जाण्याच्या संदर्भात बोलणे झाले होते. अगदी अानंदात असलेल्या तुषारने दीड तासातच आत्महत्या करून जीवन यात्रा संपवल्याने मित्रांना माेठा धक्का बसला अाहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. लाडका मित्र गेल्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...