आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी युवकास डांबून मागितली दीड लाखांची मागणी, तिन महिला पोलिसांच्या अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावात ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या नावरे (ता.यावल) येथील युवकास एका महिलेसह दोन मुलींनी घरात डांबून ठेवले. त्यानंतर चार ते पाच युवकांनी मारहाण करीत त्याचे फोटो काढले. त्याच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. अखेर युवकाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. याप्रकरणी तीन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

नावरे येथील नीलेश बापू पाटील (वय २७) हा युवक बुधवारी ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी जळगाव येथे आला होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याला शारदा नावाच्या महिलेच्या मोबाइलवरून फाेन येत होता. जळगावला आल्यानंतर फोन करा, असे ती सांगत हाेती. सायंकाळी वाजेच्या सुमारास टॉवर चौकात एक रिक्षा आली. त्या रिक्षात महिलेसह दोन मुली होत्या. त्या महिलेने सांगितल्यानुसार नीलेश त्याच्या बुलेटवर रिक्षाच्या मागे गेला. हुडको येथील एका घरात नेले. या वेळी शारदा म्हणाली ‘माझी बहीण वंदनाचे हे घर अाहे. मी तुमच्यासाठी चहा बनवते. तुम्ही बसा,’ या वेळी घरामध्ये चार आडदांड २० ते २५ वयोगटातील तरुण आले. त्यांनी नीलेशला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तू येथे कसा काय आला, तुझ्यावरगुन्हा दाखल करू. नाही तर आम्हाला दीड लाख रूपये दे, असे ते त्याला म्हणाले. त्यापैकी एकाने मोबाईलमध्ये निलेशचे फोटो काढले. त्यानंतर ितघे त्याला रिक्षात बसवून पिंप्राळ्याच्या दिशेने घेवून आले. रस्त्यात रिक्षा थांबवली. तेथे त्याला मारहाण करून पॅन्टच्या खिशातील दोन हजार रूपये काढून घेतले. तसेच त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हातातील अंगठ्या हिसकावण्याचाही प्रयत्न केला. 

यावेळी निलेशने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत शेतातील अंधारात पळून गेला. त्यानंतर त्याने मदतीसाठी मित्राला फोन लावला. मात्र यावेळी त्याचा मोबाईलही बंद झाला होता. मारहाण करणारे निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर तो रस्त्यावर आला. त्याला एक व्यक्ती दिसला. त्याला निलेशने आपबीती सांगतली. तो व्यक्ती त्याला त्याच्या दुचाकीपर्यंत घेवून गेला. तेथून निलेश दुचाकीवर गावी निघून गेला. या घटनेने मानसिक धक्का बसल्याने त्याने गुरूवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

जाळ्यात अाेढणारी टाेळी? 
वेगवेगळ्यानंबरवरून युवकांना फोन लावून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत पैशांची मागणी करणारी महिलांची टोळी सक्रिय झालेली आहे. श्रीमंत घरच्या युवकांशी मोबाइलव्दारे संपर्क करून त्यांना जाळ्यात ओढायचे. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार शहरात सुरू अाहे. पोलिसांना या महिलांवरही याबाबत संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत. 

सहा जणांना केली अटक 
नीलेशच्याफिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात शारदा नावाची महिला, तिची बहीण वंदना अन्य एक महिला यांच्यासह चार युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शारदा मोरे, वंदना मोरे, काजल तायडे (रा.पिंप्राळा, हुडको) या तिघा महिलांसह पवन विजयसिंग बागडे, मोहम्मद शहीद मोहम्मद सलीम, अर्जुन विजयसिंग बागडे (रा.कंजरवाडा) या सहा जणांना अटक केली. तपास पीएसआय प्राची राजूरकर करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...