आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर गौरीला उमेशची साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बालपणीच मायेचे छत्र हरपलेली अन् कुटुंबाचा आधार गमावलेल्या गौरीला शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरातील उमेश बाळू नेवे याने जोडीदार म्हणून हात दिला आहे. शहरातील आशादीप महिला वसतिगृहातील मूकबधिर असलेल्या गौरीचा विवाह २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेश याच्याशी नोंदणी पद्धतीने होणार आहे.
काही वर्षांपूर्वी गौरी जळगावात सापडली होती. बोलता-ऐकता येत नसल्याने वयाने लहान असल्याने तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले. मात्र, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती आशादीप वसतिगृहात एक वर्षापासून राहत आहे. गौरीने शिवणकाम ब्यूटी पार्लरमध्ये करिअर करण्याचे ठरवले आहे. गौरीशी विवाह करण्याचा ठाम निर्णय घेणारा उमेश बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला असून, त्यास कोणत्याही प्रकारे अपंगत्व नाही. त्याला अनाथ गरीब मुलीशी विवाह करायचा होता. त्या अनुषंगाने त्याने ‘आशादीप’मध्ये संपर्क साधला असता त्याला गौरीचे नाव सुचवत ती मूकबधिर असल्याचेही सांगण्यात आले. तरीही त्याने गौरीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयास आई-बाबांनीही सहज सहमती दिली.
‘आशादीप’लाकॅमेरा भेट : वसतिगृहातप्रत्येक मुलीचा फोटो काढून नोंद ठेवली जाते. त्यामुळे जेडीसीसी बँकेचे निवृत्त अधिकारी युवराज सोनवणे यांनी जावई मुलगी यांच्या हस्ते वसतिगृहाला कॅमेरा भेट दिला.
गौरी उत्तम कलाकार
- गौरी ही उत्तम कलाकार असून, तिच्यातील गुण वाखाणण्याजोगे आहेत. तिला विविध कलांची आवड असल्याने प्रशिक्षण देण्यात येत असून, ती अत्यंत रेखीव चांगली मेंदीही काढते.
प्रियंका तारू, अधीक्षिका
उमेश चालवतो रिक्षा
उमेशचे स्वत:चे घर असून, तो स्वत:ची रिक्षा चालवतो त्यातूनच त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. सर्व गोष्टींची चौकशी केल्यावरच गौरीचे रीतसर लग्न उमेशशी ठरवण्यात आले. त्यानुसार सोमवारी अर्थात २२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गौरी आणि उमेशचा नोंदणी पद्धतीने शुभविवाह होणार आहे, असे वसतिगृह पर्यवेक्षिका सुधा गिंदेवार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...