आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस अनुदान: बँकेत आधार कार्ड लिंक करावे लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- गॅस सिलिंडरवरील अनुदान 1 ऑक्टोबरपासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी बॅँकेत आधारकार्ड लिंक करून त्याची एक प्रत संबंधित एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. त्याची अंतिम मुदत 31 सप्टेंबरपर्यंत आहे.

शासनाने आधार कार्ड नोंदणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे, अशा जिल्ह्यात गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आधार कार्ड नोंदणीची टक्केवारी शासनदप्तरी 56.15 टक्के आहे. त्यामुळे ग्राहकांना आता डायरेक्ट बेनिफीट, ट्रान्सफर सबसीडीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, चंदीगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गोवा, दिल्ली, दमण या राज्यांतील 66 जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणी 50 टक्क्यांच्यावर असल्याने ग्राहकांना आता गॅस सिलिंडरीवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

सध्या ग्राहकांना 441 रुपयांना गॅस सिलिंडर मिळत आहे. 1 ऑक्टोबरपासून हे गॅस सिलिंडर 900 रुपयांना मिळणार आहे. त्यानंतर सबसीडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा केली जाणार आहे.

31 सप्टेंबरपर्यंत मुदत
केंद्र शासनाच्या ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस ग्राहकांनी आधार कार्ड बॅँकेत लिंक करून गॅस एजन्सीत द्यावे. 31 सप्टेंबर ही त्यासाठी शेवटची मुदत आहे. दीपक महाजन, संचालक, वर्षा गॅस एजन्सी, भुसावळ