आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aakashbaba Nagar Land Is Journalists Housing Society

‘ताे’ भूखंड पत्रकारांच्या गृहनिर्माण साेसायटीचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अाशाबाबानगरातीलबिल्डरांनी हडप केलेला शासकीय भूखंड महसूलमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या शिफारसीनुसार दर्पण पत्रकार

गृहनिर्माण सहकारी संस्थेला दिला हाेता. यासंदर्भातजिल्‍हाधिकारी, मनपा अायुक्त, विभागीय अायुक्तांनी ना हरकत देत प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला अाहे.

गेल्या १५ वर्षांपासून याबाबत मंत्रालयात पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पुढे अाली अाहे.

शासनाच्या मालकीचा हा भूखंड १९७३ मध्ये महाराणा प्रताप ट्रस्टला देण्यात अाला हाेता. परंतु त्या संस्थेने जागेचा उपयाेग केल्यामुळे ही जागा शासनाने काढून घेतली हाेती.

१९९९ मध्ये नियाेजित दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थेने जागेची मागणी केली हाेती. त्या वेळी तत्कालीन पालकमंत्र्यांनी ही जागा सुचवली हाेती.जिल्‍हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्यानंतर मनपानेदेखील संस्थेला जागा देण्यास ना हरकत दाखला दिला हाेता. दरम्यान या जागेवर अतिक्रमण हाेत असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीजिल्‍हा प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या अाहेत.जिल्‍हाधिकारी रूबल अग्रवाल यांनादेखील यासंदर्भात लेखी निवेदनदिले हाेते