आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party And Jalgaon Civil Hospital Issue

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सिव्हिलमध्ये रुग्णांच्या सेवेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात केस पेपर घेण्यापासून उपचार मिळेपर्यंत ठिकठिकाणी अडचणी येतात. अशाच गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रुग्णालयात वेळ देत आहेत. पाच दिवसांपासून सुरू झालेल्या मदत कार्यामुळे रुग्ण व नातेवाइक आता ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत.
आम आदमी पार्टीने कमी कालावधीत दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी आता महाराष्ट्रातही कामाला लागला आहे. जळगाव शहरातदेखील केजरीवाल यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले आहेत. तर आप पक्षाच्या संघटनाच्या दृष्टीने तालुकापातळीवर काम सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी आपतर्फे केली आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भ्रष्टाचारला लगाम व सर्वसामान्यांना दिलासा हे ध्येय असलेले कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करीत आहेत. कृष्णा माळी यांच्यासह काही कार्यकर्ते तर रुग्णालयात ओपीडी कक्षाजवळ चकरा मारताना दिसत आहेत. अधिकार्‍यांवर दबाव आणणे हा उद्देश नसून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडचणी सोडवणे हा मुख्य हेतू असल्याचे कृष्णा माळी यांनी सांगितले.
रुग्णांसोबत फिरून करताहेत मदत
ग्रामीण भागातून येणार्‍या रुग्णांना केस पेपर कसा घ्यावा, तपासणीसाठी कोणाकडे जावे, रक्त लागत असेल तर कु ठे मिळेल, यासाठी काय करावे लागेल, औषधी कुठून घ्यायची, यासाठी थेट रुग्णांसोबत फिरून मदत करीत आहेत. डोक्यावर टोपी त्यावर आम आदमी पार्टीचा शिक्का, असे चित्र पाहिल्यानंतर रुग्णदेखील त्यांच्याकडे विचारपूस करू लागले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात हे चित्र पाहायला मिळत आहे.