आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aam Adami Party News In Marathi, Loksangharsh Morcha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आम आदमी पार्टी’त जाण्याचा निर्णय पक्का, प्रतिभा शिंदे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भ्रष्टाचार विरहीत समाजाच्या निर्मितीसाठी ‘आम आदमी पार्टी’त जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाची तारीख ठरण्याचा फक्त अवधी आहे. व्यक्ती म्हणून स्वत:चा निर्णय झाला असला तरी समूह म्हणून संघटनेच्या सदस्यांपासून ते प्रत्येक पदाधिकार्‍यांची भूमिका जाणून घेतली आहे. जवळपास सर्वांचाच विचार सकारात्मक आहे, अशी माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी प्रतिभा शिंदे यांनी दिली.


अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा अन् लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात रविवारी आम आदमी पार्टीची बैठक झाली. त्यात प्रतिभा शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी खास संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आपमध्ये जाण्याचा विचार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, संसदबाह्य प्रणालीत काम करत असल्याने आपल्या संघटनेच्या सोबतच्या प्रत्येक सहकार्‍यांची मते अलीकडच्या काळात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपमध्ये जायचे की, नाही? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी खेडोपाडी बॉक्स ठेऊन त्यात चिठ्ठय़ा टाकून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जवळपास सर्वांचाच आपमध्ये जाण्याला विरोध नसल्याचे चित्र आहे.

लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा पूर्ण झाली आहे. तीन राज्यांमध्ये संघटन उभे केलेले असल्याने सर्वच जण सोबत येतील, अशी आशा आहे. व्यक्तिगत पातळीवर मात्र स्वत: आपमध्ये जाण्याचा पक्का निर्णय घेतला आहे. आपमध्ये अधिकृत प्रवेश घेतल्यावर लोकसभा निवडणूक लढवणार काय? असा प्रश्न प्रतिभा शिंदे यांना उपस्थित केला असता या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मात्र, शिंदे यांनी पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना उमेदवारी मिळेलच असेही नाही, अशी स्पष्टोक्ती शेखर सोनाळकर यांनी दिली.