आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामिरचे वक्तव्य संतापजनक, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्‍या प्रतिक्रीया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- चांगला माणूस अशी प्रतिमा असलेला अभिनेता अामिर खानने चुकीचे वक्तव्य करून देशातील वातावरण खराब केले अाहे. त्याच्याकडून चांगल्या संदेशाची अपेक्षा असताना अनपेक्षितपणे त्याने देश साेडण्याचे वक्तव्य केल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची किंमत शून्य झाली अाहे.
देशाने त्याला खूप काही दिले असतानाही त्याने देशाची जगात बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याचे वक्तव्य अत्यंत चुकीचे अाणि संतापजनक अाहे, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या.
जन भावना जिल्ह्यातील सामािजक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसह कलावंतांच्या जळजळीत
प्रतिक्रिया
सारे प्रसिद्धीसाठीच
अामिर खानला येथील मातीने माेठे केले. भारतीयांनीच त्याला डाेक्यावरही घेतले. तसेच त्याच्यासाठी देशवासीयांनी खूप काही केले. मात्र, अामिरने देशासाठी काेणतेही याेगदान दिलेले नाही. प्रसिद्धीच्या जाेरावर रग्गड पैसा अाणि दाेन बायका हीच त्याची कमाई अाहे. देशासाठी काेणतेही याेगदान नसताना त्याने देशातील वातावरण दूषित करण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह अाहे.
उदय वाघ, जिल्हाध्यक्ष,भाजप

देशाबद्दल कटू प्रतिक्रिया
जगातील मुस्लिम राष्ट्रांपेक्षाही भारतात मुस्लिम समुदाय अधिक सुरक्षित अाणि सुखी अाहे. असे नसते तर अामिर खानला सर्वांनी एवढे डाेक्यावर घेतले नसते. तरीदेखील त्याला देश साेडावा वाटत असेल तर त्याच्यासाठी ही दुर्दैवी बाब अाहे. देशाने एवढे प्रेम देऊनही त्याच्याकडून देशाबद्दल कटू प्रतिक्रिया येणे चुकीचे अाहे. त्याच्याकडून असल्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. हा प्रकार निंदनीय अाहे. अामदार किशाेर पाटील, जिल्हाप्रमुख,शिवसेना.

कडवटभावना बाहेर
अभिनेता अामिर खानची प्रतिक्रिया वरवरची नाही, तर ती त्याने मनापासून दिलेली अाहेे. त्याने भारतात राहून देशाबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकाेन ठेवून असे वक्तव्य करणे चुकीचे अाहे. मनात कडवट भावना असेल, तर ती उमटतेच. अामिरने बायकाेच्या नथीमधून तीर मारण्याचा प्रयत्न केला अाहे. त्याचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे अाहेत, हे यातून दिसले
चिमणराव पाटील, माजीअामदार, शिवसेना

खेदजनक वक्तव्य
असहिष्णुतेच्या मुद्यावर अामिरने असे वक्तव्य करणे चुकीचे अाहे. देशाबद्दल अशा भावना व्यक्त करण्याचे काेणीही समर्थन करणार नाही. अामिरला भारतीयांनी माेठे केले प्रेमही दिले. त्याची चांगला माणून म्हणून प्रतिमा हाेती; परंतु त्याने असे बाेलून सर्वांची मने दुखवली अाहेत. अशा भावना व्यक्त करण्याची त्याला गरज नव्हती. देशातील वातावरण खराब हाेईल, असे वागणे त्याच्याकडून अपेक्षित नव्हते. अामदार डाॅ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस

साफचुकीचे बाेलला
अामिरने असे वक्तव्य करणे याेग्य नाही. ताे जे बाेलला ते साफ चुकीचे अाहे. या देशात वातावरण चांगले नाही, असे वाटत असेल तर त्याने ते चांगले करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचे कार्यक्रम प्रेरणा देणारे अाहेत. ताे मुस्लिम त्याची पत्नी हिदू अाहे. त्यामुळे दाेघांनीही चांगला संदेश दिला असता, तर नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया असत्या. मात्र, त्याने चुकीचे वक्तव्य केले. { अॅड.जमील देशपांडे, जिल्हासचिव, मनसे

कारण मीमांसा व्हावी
चित्रपट सृष्टीतील एखाद्या अाघाडीच्या अभिनेत्याला आपल्या भारता सारख्या देशात असुरक्षित वाटणे, ही अत्यंत धक्कादायक अशी बाब अाहे. खरे तर या प्रतिक्रियेत त्याने त्याचे वैयक्तिक मत मांडले अाहे. त्यामुळे त्याच्या त्या वक्तव्या मागील पार्श्वभूमीची कारणमीमांसा झाली पाहिजे. भाजपचे सरकार अाल्यापासून देशात अशी भीती व्यक्त केली जात अाहे. { अॅड.संदीपपाटील, जिल्हाध्यक्ष,कॉग्रेस

खान यांचे वक्तव्य अत्यंत अयोग्य
अामिर खान प्रमाणे अनेक मुस्लिम अभिनेते, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार या देशात सन्मानाने राहतात. त्यांना देशानेच मोठे केले आहे. देशात सर्वच जाती-धर्माचे लोक राहतात. यापूर्वी अशा पद्धतीने कोणालाही अशा प्रकारची असुरक्षितता वाटली नाही. अचानक सुरू झालेले हे प्रकरण अयोग्य वाटते. { अॅड. केतन ढाके, जिल्हासरकारी वकील

आता असहिष्णुता कशी भासली?
भारत हा एकमेव असा देश आहे जेथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. २०० वर्षांपूर्वी असलेला जातीवाद आता शिल्लक राहिलेला नाही. मुस्लिम अभिनेत्यांना आत्ताच असहिष्णुता असल्याचे का भासते आहे? हा प्रश्न मला पडला आहे. तसेच अभिनेत्यांच्या कुटंुबीयांनाही कुणी त्रास दिल्याचे उदाहरण भारतात घडलेले नाही. अॅड. राजेश गवई, सरकारीवकील

अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटते
आमिर म्हणतो ते खरे आहे. भाजपचे सरकार आल्यापासून अल्पसंख्याक समाजास असुरक्षित वाटते आहे. आमिर खान देश सोडून गेल्यास इतर कोणत्याही देशात त्याला रहिवास मिळू शकतो. पण येथील अल्पसंख्याक समाजाने काय करावे? मला खासगी जीवनात असहिष्णुता असल्याचा अनुभव आला आहे. व्यावसायिक आयुष्यात मात्र असहिष्णुता असल्याचे जाणवत नाही. { अॅड. राशिद पिंजारी

वक्तव्यातून द्वेष वाढवण्याचे काम
‘अतिथी देवो भव’ म्हणत देशाच्या पर्यटन विभागाचा ब्रॅड अॅम्बेसेडर झालेल्या अामिर खानला अचानक असहिष्णुता वाढल्याचे का वाटले हे कळत नाही? सेलिब्रेटींनी देशासाठी चांगले करावे िकंवा असा द्वेष वाढवण्याचे काम तरी करू नये. प्रसिद्धीसाठी आपण जर असे प्रयोग करीत असू तर ते अयोग्य आहे. गनी मेमन, बांधकामव्यावसायिक

देशवासीयांची माफी मागितली पाहिजे
अभिनेता आमिर खानने भारताची माफी मागितली पाहिजे. देशात सर्व जातीधर्माच्या लोकांना समान वागणूक दिली जाते. ज्या देशात अापण राहतो, त्या देशाशी प्रामाणिक रहायला हवे, असे पवित्र कुराणमध्येही लिहिले आहे. आमचे धर्मगुरूही तसेच सांगतात. आमिर खानने चुकीचे व्यक्तव्य केले आहे. युसूफ मकरा, बांधकाम व्यावसायिक

चर्चेत राहण्यासाठीचे वक्तव्य
राजकीय पक्षांच्या वादातून उत्पन्न झालेला हा वाद आहे. जी गोष्ट (असहिष्णुता) अस्तित्वातच नाही तिला फोकस करणे कितपत योग्य आहे? वातावरण खराब होत असते, तर एक सामान्य माणूस म्हणून आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. आपण चर्चेत राहायला पाहिजे, या उद्देशाने सेलिब्रेटी कोणत्याही विषयावर खळबळजनक प्रतिक्रिया देतात. त्याचेच हे एक उदाहरण असल्याचे वाटते. डॉ. रवी हिराणी

देश साेडून जाणे हा पर्याय नाही
अापल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य अाहे. फक्त व्यक्ती म्हणून नाही, तर देश म्हणून िवचार करायला हवा. त्यामुळे अामिर खानचे हे वक्तव्य चुकीचे अाहे. त्याला खराेखर असे वाटत असेल तर ते का अाहे? याची कारणे शाेधावी; पण देश साेडून जाणे हा त्यावरील पर्याय नाही. { डाॅ.अपर्णा भट, नृत्यदिग्दर्शिका

असे वक्तव्य करणे सर्वस्वी अयाेग्यच
अामिर खानला भारत देशात सर्व काही मिळाले. त्याने चांगले काम केले असून, त्याची चांगली प्रतिमा लाेकांमध्ये अाहे. मात्र, एक माेठा कलाकार असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे अयाेग्य अाहे. त्यामुळे माणूस नाराज हाेताे. तथापि, अाता त्याच्याकडून काेणत्याही अपेक्षाही राहिलेल्या नाहीत. भारतीय संस्कृती सर्वांना सामावून घेणारी अाहे. {विशाखा देशमुख, कलावंत

भारतीयांच्या रक्तातच सहिष्णुता
‘सहिष्णू’ हा शब्द मुळातच संस्कृत भाषेतून अालेला अाहे. तसेच भारतीयांच्या रक्तातच सहिष्णुता अाहे. सहिष्णुता जपणे हे काही चुकीचे नाही. भारत ते जपत अालाय. अभिनेता अामिर खानने असे वक्तव्य करणे हे स्वत:साठी देशासाठीही दुर्दैवी अाहे. सहिष्णुता प्रत्येकात असते. मात्र, ती शाेधावी लागते. फक्त असहिष्णुता अाहे म्हणून त्यावरच चर्चा करणे याेग्य ठरत नाही. { ज्ञानेश्वर गायकवाड, ज्येष्ठरंगकर्मी

देशानेचप्रसिद्धी मिळवून दिली
अामिरचे चित्रपट डाेक्यावर घेतले जातात, चित्रपट १०० काेटींची कमाई करताे खूप प्रसिद्धी मिळते तेव्हा त्याला भारत देश चांगला वाटताे. त्याला भारत देश असहिष्णू वाटत असेल, तर त्याने भारतापेक्षा जास्त सहिष्णुता जिथे अाहे तिथे जाऊन राहावे. त्या देशात अापले कर्तृत्व सिद्ध करावे. मग कळेल की, तेथील प्रेक्षक जाणकार अाहेत का? ‘सत्यमेव जयते’ हे भारताचे ब्रीदवाक्य अाहे. ते त्याला मालिकेत चालते. त्यातून कमावलेला पैसा चालताे; परंतु देश चालत नाही. त्यामुळे त्याचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे अाहे.-दीपक चांदाेरकर, चांदाेरकर प्रतिष्ठान

देश साेडण्याइतकी अराजकता नाही
सध्याच्या वातावरणाबाबत प्रत्येक वेळी प्रशासन अाणि राजकारणी यांनाच दाेष देणे याेग्य ठरणार नाही. असहिष्णुता जाणवत असेल, तर ती काहीअंशी सर्वसामान्यांच्या मानसिकतेतूनही निर्माण हाेत अाहे. साेशल मीडियाचाही त्यांच्यावर परिणाम दिसून येताे. त्यातच एका माेठ्या अभिनेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यास त्याला महत्त्व प्राप्त हाेऊन ते लाेकांच्या मानसिकतेवर बिंबवले जाते. त्यामुळे तशी परिस्थिती नसेल तरी ती व्हायला वेळ लागत नाही. तथापि, देश साेडून जाण्याइतकी अराजकता भारतात नाही. { विनाेद ढगे, ज्येष्ठकलावंत