आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीची सत्ता सोडून चूक केली - आशुतोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दिल्लीची सत्ता सोडून आम आदमी पक्षाने चूक केली. दिल्लीकरांचा कौल लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवा होता, अशी कबुली ‘आप’चे प्रवक्ते आशुतोष यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पैशांचा वापर करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत त्यांच्याकडून 30-40 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला असून मतदानाच्या पूर्वसंध्येला मते विकत घेतील, असा आरोप आशुतोष यांनी केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार असल्याचेही ते म्हणाले. अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचा पैसा निवडणुकीत लावला जात आहे. दिल्लीत 49 दिवसांत जेवढे काम आम्ही केले तेवढे काम राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान येथे सत्ता असलेल्या भाजप सरकारनेदेखील केलेले नाही. दिल्लीत सत्तेत येण्यापूर्वी जनतेचा कौल घेतला होता. मात्र, सत्ता सोडण्यापूूर्वी जनतेचा कौल लक्षात घ्यायला हवा होता. ती चूक आपकडून झाल्याचे ते म्हणाले.