आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘आप’ची सदस्य नोंदणी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात ‘आम आदमी पार्टी’तर्फे रविवारपासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. एकाच दिवसात 700 सदस्यांनी नोंदणी केली आहे.जामनेर रोडवरील आकार ट्रेडर्ससमोर चॉँदवाणी चौकात सकाळी 10.30 वाजेपासून हातात झाडू घेऊन या अभियानाचा शुभारंभ जयर्शी न्याती यांच्या हस्ते झाला.

माजी नगराध्यक्ष गोकूळ कारडा, इम्रान खान, दीपक मावळे, मोहसिन पेंटर, डॉ. कैलास पाटील, मुकेश पवार, नीरज सोनवणे, हरीष सपकाळे, मोजेश चाल्र्स, रवीओम शर्मा उपस्थित होते. भ्रष्टाचाररूपी कचर्‍याची सफाई करण्यासाठी झाडू हातात घ्या, असे आवाहन गोकूळ कारडा यांनी केले. भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील 25 नंबरचे दुकान येथे दीपक मुरलीधर मावळे यांच्याशी आपच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.