आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aavishkar Competition In North Maharashtra University Jalgaon

‘आविष्कार’मध्‍ये दैनंदिन सुविधांच्या संशोधनावर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-उमवित सुरू असलेल्या ‘आविष्कार’ स्पध्रेत संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधनाचे अनेक आविष्कार सादर केले आहे. कृषीक्षेत्रावर आधारित, सोलरवर यंत्रणा, प्रदूषणावर पर्याय, दैनंदिन जीवनातील वापराच्या महत्त्वाच्या साधनांवर भावी संशोधकांनी संशोधन केले आहे. राज्यस्तरीय आंतरविद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत 19 विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी दीक्षांत सभागृहात 386 पोस्टर्स आणि 124 मॉडेल्स सादर केले. शुक्रवारी परीक्षण समितीने पाहणी करून निरीक्षण केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील 48 विद्यार्थी या स्पध्रेत सहभागी झालेत. पोस्टर्स आणि मॉडेल्सच्या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी विशेष करून दैनंदिन वापराच्या गरजांवर अधिक भर दिल्याचे दिसून आले. परीक्षण समिती प्रत्येक गटातून पाच जणांची निवड करेल. त्यांना शनिवारी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे संशोधनाची माहिती द्यावी लागणार आहे. त्यातून विजेते आणि उपविजेते यांची निवड केली जाणार आहे.

मॉडेल्स, पोस्टर्स आज पाहण्यासाठी खुले
संगणकाद्वारे रोबोटिक कारवर व्हर्क नियंत्रण, दृकर्शाव्य साधनांचा वापर, लग्नावरील खर्च कमी करून गरिबांना करता येणारी मदत, फेसबुकचा योग्य वापर अशा अनेक नावीन्यपूर्ण संशोधनावर विद्यार्थ्यांनी भर दिला. शनिवारी सकाळी 10 ते 1 यावेळेत संशोधने पाहण्यासाठी खुली राहणार आहेत. त्यामुळे अन्य महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना हे संशोधन पाहता येणार आहे.

सांस्कृतिक कलांचे सादरीकरण
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आविष्कार स्पध्रेत दिवसभराचा थकवा सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने दूर झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी, हिंदी गीतांवर विद्यार्थ्यांची पावले थिरकली. प्रशासकीय भवनसमोर उभारलेल्या रंगमंचावर विद्यार्थ्यांनी अनेक कला सादर केल्या.

स्पध्रेचा आज समारोप
स्पध्रेचा शनिवारी दुपारी 4.30 वाजता समारोप होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी संचालक व जामिया हमदर्द विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. मोईन उद्दीन हे उपस्थित राहणार आहे. कुलगुरू प्रा. सुधीर मेर्शाम हे अध्यक्षस्थानी असतील. पारितोषिक वितरण समारंभात आविष्कारमधील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांचा संवादाचा कार्यक्रम होणार आहे.

मेंदूच्या क्रियेनुसार चालणारी व्हिलचेअर
मेंदूच्या थिंकिंगनुसार चालणारी व्हीलचेअर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परेश मट्टीकली या विद्यार्थ्याने तयार केली आहे. यात सेन्सर व कंट्रोलिंग पार्ट असून शरीरातील हालचालीनुसार कंट्रोलर डेटा प्रोसेस करतो. या यंत्रणेद्वारे मेंदूची क्रिया ओळखून खुचीर्ची हालचाल अँटोमॅटिक होते. हात-पाय पूर्णत: अपंगत्व असलेल्या रुग्णांना ह्या खुर्ची वापर करता येणे शक्य असल्याने त्याने उपकरणाद्वारे मांडले आहे.

कृषी विद्यापीठाचे रेल्वेस्थानकावर बायोगॅस
कृषी विद्यापीठ राहुरीच्या हर्षवर्धन भोईटे याने रेल्वेस्थानकावर पडणार्‍या मानवी विष्टे (मैला)द्वारे बायोगॅस निर्मितीबाबत पोस्टर तयार केले आहे. रेल्वेतील विष्टा जमिनीवर पडू न देता ती एकत्रित करून रेल्वेस्थानकावर बसविण्यात येणार्‍या टँकमध्ये जमा केली जाईल. ये-जा साठी असलेल्या रूळांच्या मधल्या भागात छोट्या टँक तयार करून एकत्रित एक टँक स्टेशनलगत उभारावी. त्यातून बायोगॅस तयार करता येऊ शकतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता यातून 400 टन गॅस उपलब्ध होऊ शकतो.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...