आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल कलाम अमर रहे.., डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - युवाशक्ती फाऊंडेशन भवरलाल अॅन्ड कांताई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे मंगळवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौकात माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मेणबत्या मशाल प्रज्वलीत करून डॉ.अब्दुल कलाम अमर रहे... या घोषणा देण्यात आल्या. एलसीडी प्राेजेक्टरद्वारे डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रफीतही दाखविण्यात आली.
कार्यक्रमास माजी महापौर विष्णू भंगाळे, पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले, राजेश नाईक, प्रदीप चौधरी, युवाशक्तीचे विराज कावडीया, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी उपस्थित होते. मंजीत जांगीड. सागर जगताप, गौरव सपकाळे, भवानी अग्रवाल, नविन पाटील, विपीन कावडीया, सुरजितसिंग, अभिषेक पाटील, गौरव राणे यांनी नियोजन केले.

भिलपुराचौक : सै.नियाजअली भैय्य विचार मंचतर्फे शहिदांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अयाज अली नियाज अली, रफीक शेख, नाजीम कुरेशी, सुरज गुप्ता, शेख निजोमोद्दीन यांनी मनोगत व्यक्त केले.

दर्जीफाऊंडेशन : दर्जीफांऊडेशनतर्फे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोपाल दर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक भगत बालाणी, राज करंके उपस्थित होते.
मला सन २००३-०४ या वर्षी "राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार' हा सन्मान भारताचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सप्टेंबर २००३ रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय विज्ञान भवनात प्रदान करण्यात आला होता. डाॅ. कलाम यांनी स्मरणात ठेवून अनौपचारिक भेटीत माझ्याशी पाच मिनिटे चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी मला विचारलेली
प्रश्न पुढीलप्रमाणे :-
डाॅ.कलाम: आपणमूळचे कुठले ?
मी : सर, मी मूळचा जळगाव जिल्ह्यातील तरसोद या गावचा.

डाॅ.कलाम: यासर्व शिक्षकांमध्ये आपण सर्वांत तरुण आहात, हे आपणास ज्ञात आहे का?
मी: होसर.

डाॅ.कलाम: आपणनेमकं कोणतं विशेष कर्तृत्व केलं आहे, की इतक्या लवकर आपली या सन्मानासाठी वर्णी लावली गेली?
मी: सर,माझी अतिग्रामीण भागाशी नाड जुळलेली असल्याने मी संपूर्ण नाेकरी खेड्यातच करताना शैक्षणिक कार्यासोबत आजतागायत ५०० लोकांना कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करून या शस्त्रक्रिया करवून घेतल्यात. सोबतच शैक्षणिक प्रगतीसाठी अतिदुर्गम भागातील शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.

डाॅ.कलाम: खरचआपण खूप उत्कृष्ट काम करत आहात. आपली खेड्याशी जुळलेली नाड पाहून मला माझे इयत्ता चाैथीचे शिक्षक आठवले श्री.बालसुब्रह्मण्यम सर! त्यांच्या संस्कारामुळेच मी इथवर पोहोचलो आहे. ही आठवण सांगतानाच त्यांचे डोळे पाणावलेत. डाॅ.कलामांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित झाल्याचे अाजही स्मरणात अाहे.
-भगवान त्र्यंबक देवरे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी
एकता बहुउद्देशीय महिला मंडळ

माजीराष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात अाली. दुर्दम्य अाशावादाचे प्रतीक, ध्येय, चिकाटीच्या जाेरावर स्वत:ला विकसित करता येऊ शकते, या िवचारांची प्रेरणा देणारे प्रेरणास्त्राेत काळाच्या पडद्याअाड गेल्याची खंत उपस्थित महिलांनी व्यक्त केली. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा तायडे, उपाध्यक्षा शाेभा बिऱ्हाडे, सचिव इंदुबाई सरदार, सहसचिव मनीषा साेनवणे, गायत्री माेरे, अवनी बिऱ्हाडे, िवद्या सुरवाडे उपस्थित हाेत्या.

इकराथीम महाविद्यालय
माजीराष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात अाली. प्रा.वकार शेख यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रा.अाय.एम.पिंजारी यांनी अब्दुल कलाम यांनी जगासमाेर मिशन २०२० चे लक्ष्य ठेवले. विद्यार्थी प्राध्यापकांनी जास्तीत जास्त कार्य करीत राहावे, असे सांगितले. प्रा.मुजम्मिल काझी यांनी अब्दुल कलाम यांच्या मते काेणतेही काम हे छाेटे नसतात. मनुष्याने ते काम स्वखुशीने करीत राहावे असे सांगितले. प्रा.डाॅ. राजेश भामरे, प्राचार्य डाॅ. सय्यद जाकीर अली यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रा.चांद खान यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजू गवरे, प्रा.अंजली कुळकर्णी, प्रा.रेखा देवकर, प्रा.अाएशा बासित उपस्थित हाेते.

युवाशक्ती जैन मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात डाॅ. अब्दुल कलाम यांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात अाली.