आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अभय’ याेजनेची अधिसूचना जारी, ३१ जुलैपर्यंत असेल पैसे भरण्यास मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एलबीटीचीरक्कम भरलेल्या व्यापाऱ्यांसाठी शासनाने ‘अभय’ याेजना जाहीर केली हाेती. त्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना जून राेजी नगरविकास विभागाने जारी केली अाहे. ३१ जुलैपर्यंत एलबीटीची मूळ रक्कम भरणाऱ्या व्यापाऱ्यांना व्याज दंडाची रक्कम माफ करण्यात येणार अाहे. त्यामुळे महापालिकेची थकलेली रक्कमही वसूल हाेण्यास मदत हाेणार अाहे.

जळगाव महापालिकेत एप्रिल २०१०पासून स्थानिक संस्था कर (एलबीटी)ची अंमलबजावणी सुरू झाली हाेती. मनपाकडे ७५०० व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नाेंदणीही केली हाेती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एलबीटी रद्द हाेईल म्हणून व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणे बंद केले हाेते. युती सरकारने अाॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घाेषणा केली अाहे. परंतु, ज्या व्यापाऱ्यांनी अातापर्यंत एलबीटीचा भरणा केलेला नाही अशा व्यापाऱ्यांसाठी ‘अभय’ याेजना जाहीर केली हाेती. त्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना जून राेजी काढण्यात अाली असून, या याेजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत राहणार अाहे. महापालिकेत नाेंदणी केलेल्या व्यापाऱ्यांना या याेजनेचा लाभ घेता येणार अाहे. एलबीटीची मूळ रक्कम भरल्यास ‘अभय’ याेजनेंतर्गत व्याज दंंडाची रक्कम माफ करण्यात येणार अाहे. परंतु, ३१ जुलैनंतर भरल्यास त्यांना व्याज दंडाची रक्कमदेखील भरावी लागणार अाहे. या याेजनेंतर्गत लाभ घेतलेल्या व्यापाऱ्यांपैकी १० टक्के व्यापाऱ्यांची निवड करून त्यांची फेरतपासणी करण्यात येणार अाहे. त्यात त्यांच्या िबल पुस्तकाची कागदपत्रांची तपासणी केली जाणार अाहे.

एलबीटीच्या या याेजनेचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा
एलबीटी‘अभय’ याेजनेचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच नाेंदणी केलेल्या नाेंदणी केलेल्या व्यापाऱ्यांनी नाेंदणी करून घ्यावी मूळ रक्कम भरावी. त्यामुळे पुढच्या त्रासापासून सुटका हाेणार अाहे. मात्र, ३१ जुलैनंतर भरल्यास व्याज दंडाचीदेखील रक्कम भरावी लागणार अाहे.
- पुरुषाेत्त मटावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ