आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस पदवींचा मूळ सूत्रधार मोकाटच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी घेतलेल्या ‘शिक्षा विशारद’ या बोगस पदवीचे रॅकेट पूर्ण महाराष्ट्रभर असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील बोगस पदवीधर शिक्षकांवर झालेल्या कारवाईची माहिती घेण्यात येत आहे. त्यावरून शैक्षणकि क्षेत्रात ‘शिक्षा विशारद’सारख्या बोगस पदवीचे लोण किती मोठ्या प्रमाणात फैलावलेले आहे, हेदेखील स्पष्ट होत आहे. दरम्यान, या पदवीवकि्रीचा गोरखधंदा करणारा साक्री तालुक्यातील िपंपळनेरचा सूत्रधार मात्र अद्यापही मोकाटच आहे. तसेच बोगस पदवीधर शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या अधकिाऱ्यांच्या अडचणी आता वाढू लागल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत असलेल्या शाळांमध्ये कार्यरत प्राथमकि शिक्षकांनी पदोन्नतीच्या लाभासाठी हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग विद्यापीठ (अलाहाबाद) येथील बोगस पदवी मिळवली. ‘दिव्य मराठी’ने हे बिंग फोडल्यानंतर हे बोगस पदवी प्रकरण बाहेर आले खरे. मात्र, प्रशासनाने बोगस शिक्षकांवर कारवाई करता त्यांना चक्क अभय िदल्याने ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर राज्यभरात या बोगस पदवींचा सुळसुळाट असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी नाशकि अहमदनगर जिल्ह्यात बोगस पदवीधर शिक्षकांवर कारवाई झालेली आहे. तसेच रत्नागिरी, यवतमाळ या ठकिाणी तर बोगस पदवींच्या आधारे पदोन्नतीदेखील देण्यात आली होती. यासह रायगड जिल्ह्यातही असाच उद्योग झालेला आहे. जवळच्याच नंदुरबार जिल्ह्यातही बोगस पदवी मिळवून विस्तार अधकिारी केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळवण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातदेखील बोगस ‘शकि्षा विशारद’ पदवी संपादित करणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्याच्या माध्यमकि शिक्षणाधकिारी कार्यालयांतर्गतदेखील ‘शकि्षा विशारद’ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पिंपळनेर येथून बोगस पदवींची ३० ते ३५ हजार रुपयांत वकि्री होत होती. वकि्री करणारा मूळ सूत्रधार मात्र अद्यापही मोकाटच आहे. तसेच या प्रकरणाचे महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र असलेल्या येवला येथे अद्यापपर्यंत चौकशी झालेली नाही. महाराष्ट्रभरात सुळसुळाट असलेल्या या बोगस पदवी प्रकरणाची राज्य शासनाकडून सखोल चौकशी करण्यात आल्यास महाराष्ट्रातील बोगस पदवीचे मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत बोगस पदवीधारकांना पाठीशी घालणाऱ्या अधकिाऱ्यांकडून इतर जिल्ह्यांत झालेल्या कारवाईची माहिती जमवणे सुरू आहे. मात्र, बोगस शिक्षकांवर कारवाई करण्याएेवजी या प्रकरणाला गांभीर्याने घेता प्रशासकीय प्रमुख असलेल्या मुख्य कार्यकारी अधकिाऱ्यांनी संबंिधत शिक्षकांना सोडून दिल्यामुळे जिल्हा परिषदेतील अधकिाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे याविरोधात पुन्हा चौकशीची आवश्यकता आहे.

...तर गुन्हे दाखल करणार
याप्रकरणीतक्रार करणाऱ्या प्राथमकि शिक्षक समितीने पाठपुरावा अद्यापही सुरूच ठेवलेला आहे. प्रशासनाकडून बोगस पदवीप्रकरणी कारवाई करण्यात आली नाही, तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू. तसेच याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षक समितीने केली आहे.

तक्रारदार शिक्षकांवर दबाव...
बोगसपदवी प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या प्राथमकि शिक्षक समितीच्या पदाधकिाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर दबाव येत आहे. त्यात प्रशासकीय प्रमुखासह राजकीय दबावदेखील वाढू लागला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आवारात शिक्षक समितीच्या पदाधकिाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्नही झालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...