आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..आणि चर्चेत नसलेली चर्चा आली प्रत्यक्षात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विरोधक एकत्र आले तरच सत्ताधार्‍यांना पायउतार करणे शक्य होणार असल्याचे मानणारे नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी सायंकाळी उशिरा अबू आझमी यांची भेट घेऊन त्यांना महाआघाडीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. बागवान मोहल्लय़ात मंगळवारी सायंकाळी शाखा उद्घाटनानंतर दोघांची अनियोजित भेट होऊन यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली.

उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मंगळवारी शहरातील अल्पसंख्याक भागास भेटी दिल्या. तसेच सायंकाळी 7.30 वाजता जोशीपेठ भागात शाखेचे उद्घाटन केले. दरम्यान, आझमी येत असल्याची माहिती मिळाल्याने महानगर विकास आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पालिकेतील सत्ताधार्‍यांना पायउतार करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती दिली. सर्व पक्ष एकत्र येऊन ‘एक वॉर्ड एक उमेदवार’ देण्याचा विचार असून, सोबत येण्याचे आमंत्रणही दिले. त्यावर अबू आझमी यांनी नरेंद्र पाटील यांना मुंबई व दिल्लीतील भ्रष्टाचार्‍यांना पायउतार करण्यासाठी आपल्यासारख्या माणसाची गरज असल्याने आपण तिकडे यावे, असे आमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले.