आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात न झालेल्या चर्चेची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-‘अबू आझमींचा निरोप आला आहे आणि ते भेटायला येणार आहेत,’ असं विधान खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी दुपारी केलं आणि अवघ्या काही तासांत स्वत: आझमी यांनीच ‘ते मुद्दाम अफवा पसरवित आहेत’, असं सांगितलं. एवढच नाही तर, महापालिकेतले सत्ताधारी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, असा आरोपही केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाड्या आणि युतीच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यात आज सकाळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांना भेटायला जात असल्याची चर्चा सुरू करण्यात आली. त्यामुळे मुस्लीम समाजात आश्चर्यमिर्शीत चर्चा सुरू झाली होती. या चर्चेची खातरजमा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने रमेश जैन यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीही अबू आझमी यांच्याकडून भेटण्यासाठीचा निरोप आला आहे, असेच सांगितले. सायंकाळी आझमी यांनी मात्र, या अफवा असून जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्याचे सांगितले.

काय म्हणाले रमेश जैन?
दुपारी 12.30 वाजता ‘अबू आझमी मला भेटायला येणार आहेत, असा निरोप त्यांच्याकडून आला आहे. वेळ आणि ठिकाण मात्र अजून ठरलेले नाही. सर्वांसाठीच आपले दरवाजे उघडे आहेत.’
सायंकाळी 7.30 वाजता ‘समाजवादी पक्षाचे प्रमोद नेवे मला त्या संदर्भात सारखे फोन करीत होते. मीच दुपारनंतर कोर्टात असल्याने त्यांना आता भेटू शकत नसल्याचे सांगितले.’


काय म्हणाले आझमी?
0 मी कोणालाही निरोप पाठविलेला नसून महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावरच लढवू.
0 पहिल्याच दिवशी 35 उमेदवारी अर्ज इच्छुकांनी नेले. प्रतिसाद उत्तम आहे.
0 निवडणुकीत पैशांचा वापर करणार नाही.
0 सुशिक्षित उमेदवारांनाच संधी दिली जाईल.
0 जळगाव शहर, भुसावळ, रावेर, चोपडा, एरंडोल या विधानसभा मतदारसंघात सपाचे उमेदवार असतील.