आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abu Azami News In Marathi, Samajwadi Party, Sharad Pawar, Divya Marathi

शरद पवार ‘कन्फ्युज’ व्यक्तिमत्त्व , आझमी यांची खरमरीत टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी भाजपचा धाक दाखवत मुस्लिम समाजाच्या मतांवर सत्ता उपभोगली, अशी खरमरीत टीका आझमी यांनी धुळयात केली. मुस्लिमांची मते घेऊनही त्यांचा विकास केला नाही. यासाठी धुळे व भिवंडीतून सपा उमेदवार देणार आहे, असेही आझमी यांनी सांगितले.


पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी धुळे दौरा केला. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येक वेळी कॉँग्रेसकडून जातीयवादी भाजप-शिवसेनेची सत्ता येऊ नये, यासाठी मुस्लिमांना कॉँग्रेसला मते देण्यास सांगितले जाते. परंतु निवडून आल्यावर कोणत्याही समस्या सोडवल्या जात नाहीत. राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून मुस्लिम समाजास उमेदवारी दिली गेलेली नाही. भिवंडी, धुळे येथून मुस्लिम उमेदवार दिले असते तर ते हमखास निवडून आले असते. परंतु केवळ अकोल्याच्या जागेवर मुस्लिम उमेदवार दिला आहे.


धुळे व भिंवडी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर मुस्लिम आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर उमेदवार देण्यात येईल. भाजप हा पक्षाचा शत्रू असला तरी कॉँग्रेसही शत्रूपेक्षा कमी नाही, असे त्यांनी सांगितले. जळगाव, धुळे व मालेगाव येथील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.


राज्यात 22 ते 25 जागांवर उमेदवार देणार
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात 22 ते 25 जागांवर उमेदवार देणार आहेत. अद्याप कोणत्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. वर्धा, अहमदनगर,यवतमाळ, चेंबूर, जालना, गोंदिया, रामटेक, बीड, नांदेड, बुलढाणा, भिवंडी, धुळे, मालेगाव, जळगाव, रावेर, परभणी, हिंगोली, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उस्मानाबाद येथून सपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती आझमी यांनी दिली.