आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फातलेंचे १०० दिवस भरले!, एसीबीच्या कारवाईने महापालिकेत सन्नाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मालेगाव महापालिकेतून जळगाव महापालिकेत रूजू हाेऊन मंगळवारी १०० दिवस पूर्ण झालेल्या उपायुक्त राजेंद्र फातलेंची बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विकेट पाडली. अापल्या विभागातील कर्मचाऱ्यांना रूजू करून घेण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच माेठा मासा गळला लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात अाल्या. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा अनुभव असलेल्या पालिकेने वर्षांनंतर वरिष्ठ अधिकारी अडकल्याने पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

शासनाच्या नगरविकास विभागाने जून महिन्यात महापालिकेतील तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या हाेत्या. त्यात मालेगाव पालिकेतील उपायुक्त राजेंद्र फातले यांची जळगावला बदली झाली. २७ जून राेजी रूजू झालेल्या फातलेंचा महिनाभराचा कालावधी हा रजेत गेला. अत्यंत कमी बाेलणारे फातलेंनी उर्वरित काळात अापल्या कामाचे स्वरूप उघड करायला सुरुवात केली. एकीकडे अायुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना फायलींचा निपटारा करण्याचे अादेश दिलेले असताना फातलेंकडे अतिमहत्त्वाच्या सर्वच फायली पडून राहत असल्याच्या तक्रारी अायुक्तांकडेही येत हाेत्या. त्यातच नगररचना विभागातील सहा अभियंत्यांच्या निलंबनाचा विषय चांगलाच गाजत असल्याने त्यांना रूजू करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर सुरू हाेत्या. ही फाइल मंजूर व्हावी, यासाठी निलंबन झालेले अभियंते तेराव्या मजल्यावर चकरा मारताना दिसत हाेते. कामास हाेणाऱ्या विलंबामागे नेमके काय कारण अाहे हे कारवाईनंतर स्पष्ट झाले.

ती फाइल ताब्यात घेतली
बुधवारीसकाळी फातले यांना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग साेनवणेंसह त्यांचे पथक सकाळी १०.४५ वाजता पालिकेत दाखल झाले. लिफ्टमध्ये प्रवेश करताच कुठेही लिफ्ट थांबवता थेट तेराव्या मजल्यावर नेण्यास सांगितले. त्यानंतर अायुक्तांच्या दालनात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना त्यानी अायुक्तांबाबत विचारणा केली फातलेंना अटक केल्याची माहिती दिली. दरम्यान, अायुक्त जीवन साेनवणे हे कामाची पाहणी करण्यासाठी बाहेर असल्याने पथकाने तेराव्या मजल्यावरील फातलेंच्या दालनात प्रवेश केला. स्वीय सहायकाकडून त्या सहा अभियंत्यांशी निगडीत फाइल ताब्यात घेऊन निघून गेले. ही सर्व प्रक्रिया इतक्या जलदगतीने हाेत गेली की अनेकांना नेमके काय घडले याचा पत्ताही लागला नाही. मात्र, उपायुक्तांना लाच घेताना पकडल्याची माहिती बाहेर पडताच शहरात पसरली हाेती.

दुपारच्या बैठकीत सन्नाटा
अायुक्तसाेनवणे यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता सर्व विभागप्रमुखांची बैठक अायाेजित केली हाेती. यासंदर्भातील नियाेजन मंगळवारीच करण्यात अाले हाेते. या बैठकीला फातलेंनाही बाेलावले हाेते. परंतु त्यांच्यावर कारवाई झाल्याने दुपारी अायुक्तांच्या दालनात उपस्थित असलेल्या विभागप्रमुखांच्या चेहऱ्यावर असलेला तणाव स्पष्ट दिसत हाेता. एवढ्या माेठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने फायलींसाठी हाेणारी चिरीमिरी अाता तरी थांबेल का? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे.

कर्मचाऱ्यांकडून दुसरी कारवाई
अनेकदाअधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकाची अडवणूक हाेत असल्याच्या तक्रारी येत असतात. कामे लवकर व्हावेत, चुकीच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना मागताही पैसे मिळत असल्याचे सांगितले जाते. परंतु कर्मचाऱ्यांकडूनच अापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा हा दुसरा प्रसंग असल्याचे सांगण्यात अाले. २००८ मध्ये कॅफाे अविनाश साळुंखे यांनाही कर्मचाऱ्यांनीच पकडून दिले हाेते. अातादेखील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याच्या कारणावरून फातलेंविरुद्ध कारवाई झाल्याचे सांगितले जात अाहे.

अभियंत्यांचे निलंबन प्रकरण
मनपाच्या२५ जुलै २०१४ राेजी झालेल्या महासभेत नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांचे निलंबन करून कायमस्वरुपी बडतर्फीची शिफारस करणारा ठराव क्रमांक १२८ सर्वानुमते मंजूर करण्यात अाला हाेता. या ठरावाची अंमलबजावणी करण्याएेवजी नगररचनातील तत्कालीन सहायक नगर रचनाकार अरविंद भाेसले, रचना सहायक संजय दिनकर पाटील, नरेंद्र जावळे, सतीश परदेशी, याेगेश वाणी, गाेपाळ लुले यांनी ठराव क्रमांक १२८ विखंडनासाठी स्वत:च्या स्वाक्षरीने निवेदन दिले हाेते. याबाबत २४ एप्रिल २०१५ राेजी मनसेचे नगरसेवक अनंत जाेशी यांनी हा प्रकार उघडकीस अाणला हाेता. सभागृहाने केलेल्या ठरावाचा सन्मान राखता त्याचा अवमान केल्याचा ठपका सर्व सहा अभियंत्यांवर ठेवण्यात अाला हाेता. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कारवाई करण्याचा ठराव महासभेत केला हाेता. त्यानंतर तत्कालीन अायुक्तांनी सर्व सहा जणांचे विभागीय चाैकशीला अधिन राहून निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई हाेऊन अाता वर्ष उलटले अाहे. अद्याप चाैकशीही सुरू झाली नाही. तत्कालीन अायुक्तांनी पदभार साेडण्यापूर्वी सहा जणांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया राबवली हाेती. त्यानंतर हे प्रकरण माे पडले हाेते. तर अभियंते राेज अायुक्त उपायुक्तांकडे चकरा मारत हाेते.

अधिकाऱ्यांचा प्रस्ताव देणार
मंगळवारीपालिकेतील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात अाला. यात अतिरिक्त अायुक्त, उपायुक्त, सहायक अायुक्त, लेखापरीक्षक, लेखाधिकारी, सहायक संचालक, जीवशास्त्रज्ञ, अाराेग्याधिकारी या पदांचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना फातलेंनी मांडली हाेती. अाता फातलेंवर कारवाई झाल्याने एक एेवजी दाेन उपायुक्तांची नियुक्ती व्हावी, असा प्रस्ताव पाठवावा लागणार अाहे.

आठवड्यात तिसरी कारवाई
नगरपालिकेतूनमहापालिकेत रूपांतर झाल्याचा अादेश शासनाने काढला त्याच दिवशी २१ मार्च २००३ राेजी नगरपालिकेचे लाेकनियुक्त नगराध्यक्ष डाॅ. के.डी.पाटील यांना १० लाखांची लाच घेताना अटक करण्यात अाली हाेती. त्यात त्यांची निर्दाेष मुक्तता झाली अाहे. त्यानंतर २००८ मध्ये मनपाचे कॅफाे अविनाश साळुंखे यांनाही लाच प्रकरणात अटक करण्यात अाली हाेती. त्यानंतर अाता उपायुक्तांना रंगेहाथ पकडण्यात अाले. अातापर्यंत अभियंते, कनिष्ठ लिपिक यासारख्या पदाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात अाली अाहे. अन्न निरीक्षक एस. व्ही.पांडे यांनाही लाच प्रकरणात निलंबित करण्यात अाले अाहे. गेल्या अाठवड्यात प्रभाग समिती मधील लिपिक अशाेक सैदाणे अशाेक म्हस्के यांना अटक करण्यात अाली हाेती.

निलंबनाविषयीचा निर्णय शासनावर
उपायुक्तपदावर नियुक्ती करण्याचा अधिकार शासनाचा असल्याने लाचलुचपत विभागाकडून कारवाईचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर शासन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. यासंदर्भात अायुक्तांकडे अहवाल अाल्यास अायुक्त ताे नगरविकास विभागाकडे पाठवण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...