आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी पदग्रहणात शिवसेना दूर; भाजप पदाधिकारी व्यासपीठावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मनपात नूतन महापाैरांच्या पदग्रहणाला राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांची मांदियाळी जमली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून शिवसेनेने दूर राहणे पसंत केले. मात्र, मित्रपक्ष कांॅग्रेसने मांडीला मांडी लावून साथ दिली. तितकीच थेट व्यासपीठावरील साथ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही दिली. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनीही भाजप-सेनेची साथ घेऊन विकासाचे सूताेवाच केल्यामुळे जिल्हा परिषदेनंतर या पक्षांनी महापालिकेतही समझाेत्याचे राजकारण केल्याचे दिसले.
नवीन महापाैर कल्पना महाले यांनी शुक्रवारी पदग्रहण केले. सकाळी अकरा वाजता असलेला हा कार्यक्रम तब्बल ४० मिनिटे उशिरा सुरू झाला. कार्यक्रमाला राजकीय नेत्यांची मंदियाळी हाेती. प्रमुख विराेधी पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र याकडे पाठ फिरविली. भाजपचे अनूप अग्रवाल, हिरामण गवळी, विनोद मोराणकर, प्रतिभा चाैधरी हे पदाधिकारी मात्र उपस्थित हाेते. त्यातील काही जण व्यासपीठावरही हाेते. त्यामुळे राष्ट्रवादीला यापुढे भाजपची साथ मिळेल, अशी चर्चा सुरू हाेती. त्याच वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनीही विराेधकांना साेबत घेऊन विकास करण्याचे सूताेवाच केले. सर्व विभागांचे प्रमुख मंडपात जाऊन बसले. त्यामुळे पाणीपट्टी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना थांबावे लागले. मनपाबाहेर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा प्रश्न पुढे अाला; परंतु वाहतूक शाखेचा कोणताही कर्मचारी नव्हता. दुपारी १.४५ पर्यंत कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे मिळेल त्या वेळेत दांडीबहाद्दर कर्मचारी विभागप्रमुख येण्यापूर्वी कार्यालयात हजर होऊ लागले. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जयश्री अहिरराव, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, सोनल शिंदे, रश्मीबानो जुलाहा, आयुक्त संगीता धायगुडे, चंद्रकांत सोनार, रमेश श्रीखंडे, सुनील महाले, संदीप महाले, मोहन नवले, युवराज करनकाळ, कमलेश देवरे, यश कदमबांडे, मनोज मोरे, ज्योती पावरा उपस्थित होते.

शहराने पाहिला विकास
^प्रशासन-लोकप्रतिनिधी एकत्र आले तर विकास होतो. दोघांच्या मदतीने झालेला विकास धुळेकरांनी पाहिला आहे. पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या धोरणामुळेच महिलांना आरक्षण मिळू लागले. त्याचे फलित म्हणून महापालिकेत आतापर्यंत तीन महिलांना महापौरपदाची संधी मिळाली. आयुक्त धायगुडे महापौर महाले हे जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील. आता यापुढेही शहराचा विकास झपाट्याने होईल. -राजवर्धनकदमबांडे, माजी आमदार

राष्ट्रवादी-भाजप एकत्र
कार्यक्रमाचीऔपचारिकता असो अथवा विकासासाठी एकजूट, कारण काही असले तरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, कांॅग्रेस भाजपचे जिल्हाप्रमुख पदाधिकारी एकाच व्यासपीठावर दिसून आले. तथापि शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी कार्यकर्ता मात्र या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसून आला नाही. त्यामुळे या मागील कारणही गुलदस्त्यात आहे.

भाषण चार मिनिटांचे, लागली २८ मिनिटे
एकीकडे सत्कार समारंभ सुरू असताना वेळही अधिक खर्ची होत होता. हे ओळखून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी सत्कार नंतर करा, असा संदेश दिला. त्यामुळे सत्काराच्या कार्यक्रमाला काही क्षणाचा विराम देण्यात आला; प्रत्यक्षात मात्र दुपारी वाजून मिनिटांनी कदमबांडे यांना बोलण्याची संधी मिळाली. अवघ्या चार मिनिटांत भाषण आटाेपून १.१२ वाजता त्यांनी विराम दिला. आयुक्त संगीता धायगुडे, नूतन महापौर कल्पना महाले, संदीप बेडसे यांनी २८ मिनिटे संबोधले.
बातम्या आणखी आहेत...