आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरातीपूर्वीच अभियंत्याची अंत्ययात्रा, कारला अपघात; एक ठार, एक ज‌‌खमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीयमहामार्गावरील शिवकाॅलनीतील गायत्री हाॅस्पिटलसमोर सोमवारी रात्री वाजता झालेल्या भीषण अपघातात सिंचन विभागाचे उपअभियंता रविराज सैंदाणे यांचा मृत्यू झाला. त्याचे २४ जानेवारीला लग्न होते. लग्नाची वरात निघण्यापूर्वीच रविराज यांची अंत्ययात्रा निघाली. रविराज महापालिकेतील अधीक्षक गोपाल राजपूत यांचे चिरंजीव होते.

सिंचन विभागातील उपअभियंता रविराज गोपाल सैंदाणे (राजपूत) (वय २४) आिण केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता स्वप्निल शामराव पाटील (वय २४, रा. रावेर) हे दोघे मित्र सोमवारी रात्री वाजता जेवण करून फोर्ड फिगोने (क्रमांक एमएच-१९-बीजे-००८२) घरी जात होते. स्वप्निल यांनी त्यांच्या कारने रविराज यांना त्यांच्या भिकमचंद जैननगरातील घरी सोडायचे होते. रिंगरोडवर जास्त गतिरोधक असल्याने पिंप्राळा गेटकडून जाता महामार्गावरून बेंडाळे स्टाॅपकडून ते जात होते. शिवकाॅलनीतील गायत्री हाॅस्पिटलसमोर गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून अचानक एक ट्रक आला. त्या ट्रकचा एकच हेडलाइट सुरू असल्याने चालक रविराज यांना सुरुवातीला ती मोटारसायकल येत असल्याचे वाटले. मात्र, जवळ आल्यानंतर तो ट्रक असल्याचे समजल्यावर त्यांनी जीव वाचवण्यासाठी कार रस्त्याच्या उजव्या बाजूला उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याची साइडपट्टी खाेल असल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या मैलाच्या दगडावर जोरात आदळली आिण तिचे पुढील डाव्या बाजूचे टायर फुटल्यामुळे कारने फुटबाॅलसारखी आदळून तीन ते चार पलट्या घेतल्या. या वेळी बाजूला बसलेले स्वप्निल बाहेर फेकले गेले. मात्र, गाडी चालवत असलेले रविराज गाडीखाली दाबले गेले. त्यात त्यांच्या डाेक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्निल यांच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना उपचारासाठी आकाशवाणी चाैकातील विनोद हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
२४ जानेवारीला होता विवाह
मनपातप्रभाग क्रमांक ४मध्ये सेवेत असलेले गोपाल राजपूत यांचे शालक इंद्रसिंग पाटील यांच्या मुलीशी रविराज यांचा गेल्या वर्षी डिसेंेबर महनि्यात साखरपुडा झाला होता. २४ जानेवारीला अिजंठा लाॅनवर त्यांचा विवाह होणार होता. लग्न महनिाभरावर आल्यामुळे घरात कामाची लगबग सुरू होती. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी उचलले
मोटारसायकलचोराला घेऊन जात असलेल्या जिल्‍हापेठ पोिलसांच्या दिलीप पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, उमेश भालेराव, योगेश बोरसे यांना स्वप्निल यांनी आवाजदिला. पोिलसांना काेणी हाक मारली, हे कळले नाही. मात्र, थांबून त्यांनी पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. यात रविराज यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मंगळवारी दोघेही नांदुऱ्याला जाणार होते
सोमवारीस्वप्निल लग्नासाठी रावेर येथे मुलगी पाहून आले होते तसेच रविराज सोमवारी सायंकाळी नांदुरा येथे जाणार होते. मात्र, स्वप्निल म्हटले की, आपण मंगळवारी दोघे बरोबर माझ्या गाडीने जाऊ, सायंकाळी परत येऊ. यामुळे रविराज गेले नव्हते.

रविराज यांची बहीण जयश्री यांना वडिलांची प्रकृती खराब झाल्याचा निरोप देऊन बोलवण्यात आले. मंगळवारी दुपारी वाजता जयश्री पतीसह गाडीने घराजवळ आल्या. घराजवळ एवढी गर्दी का? नक्कीच काहीतरी िवपरीत घडले असल्याची शंका त्यांना आली. त्यामुळे त्यांनी काकांना विचारले, काका एवढी गर्दी का झाली हो? त्यानंतर त्यांच्या लक्षात आले म्हणून त्या धावत घरात आईजवळ गेल्या. या वेळी भावाच्या मृत्यूची बातमी एेकल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला.
दोघे जिवलग मित्र
स्वप्निलआणि रविराज या दोघांनी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात एकाच वर्गात शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ते पुणे येथे गेले होते. तेथे दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षण घेत असले, तरी कायमच एकत्र राहत होते. गेल्या वर्षी रविराज हे महाराष्ट्र लाेकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सिंचन विभागाच्या उपअभियंता परीक्षेत उत्तीर्ण झाले. एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन महनि्यांपूर्वी बुलडाणा जिल्‍ह्यातील नांदुरा येथे त्यांची नियुक्ती झाली होती. तसेच स्वप्निल हेही केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदावर धुळे येथे कार्यरत आहे. त्यांचीही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नुकतीच निवड झाली आहे.