आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्करी पडली महागात; एकाचा हात मोडला तर दुसरा गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-गोलाणी मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील अँगलवर बसलेल्या युवकाशी मस्करी करण्याच्या नांदात दोघे तरुण खाली कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. यात चंदन गवळी (वय 28 रा.गवळीवाडा, शनिपेठ) हा गंभीर जखमी झाला असून स्वप्नील शेळके (वय 22, रा.कासमवाडी) याचा हात मोडला आहे.

मार्केटमधील पहिल्या मजल्यावर गवळी याची चहाची टपरी आहे. तर शेळके हा शेजारच्या सारिका मोबाइल या दुकानावर कामाला आहे. दुपारी 4 वाजता शेळके गवळीच्या चहाच्या टपरीकडे असलेल्या एका दुकानातून समोसे घेऊन परत जात असताना ही घटना घडली. दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे एकमेकांची गंमत घेण्यात हा अपघात घडला. गवळी अँँगलवर बसलेला असताना शेळके याने त्याला धक्का दिला. त्याच क्षणी गवळी खाली पडत असताना शेळकेने त्याला वाचवण्याचा प्रयत्‍नकेला. त्याचे प्रयत्‍न अपयशी ठरले आणि दोघेही खाली कोसळले. दोघेही सुमारे 15 फू ट खोल तळमजल्यावर पडले. गवळी डोक्यावर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

15 फूट उंचीवरून खाली पडलेल्या गवळीचे डोके खाली होते. डोक्यावर पडल्यानंतरही त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला नाही. त्यामुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. घटना घडल्यानंतर मार्केटमधील व्यापार्‍यांनी तत्काळ दोघांनाही डॉ.ए.जी.भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. डोक्याला मार लागल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आयसीयूत ठेवले आहे. तत्काळ त्याच्या डोक्याचे सीटीस्कॅन करण्यात आले. या घटनेनंतर गोलाणी मार्केटच्या व्यापार्‍यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

कापडामुळे बचावले
तळमजल्यावर असलेल्या भाजीपाल्याच्या दुकान चालकाने पाऊस, घाणीपासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर प्लास्टिकचा कापड लावलेला आहे. गवळी आणि शेळके दोघेही तळमजल्यावर पडत असताना ते आधी त्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या पडण्याचा वेग कमी झाला. परिणामी शेळके याला जादा मार लागला नाही. मात्र, गवळी डोक्यावर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.