आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्हावे येथे टेम्पाे कलंडली; सहा प्रवासी जखमी, दाेघे गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहाळ- संसारोपयाेगी वस्तू घेण्यासाठी येत असलेल्या प्रवाशांचा मिनी टेम्पाे कलंडल्याने झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी वाजता न्हावे येथे बसस्थानकाजवळ झाला.

वळणाचा अंदाज चालकाला अाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या रस्त्यावर अपघात मालिका सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

जखमींना तातडीने चाळीसगाव येथे ग्रामीण रुग्णालयात अाणण्यात अाले. एम.एच.१५ सी.के.८३०८ हा प्रवासी वाहतूक करणारा टेम्पाे मालेगाव येथून निघाला हाेता. जखमींमध्ये दाेन जण बहाळचे अाहेत. मालेगाव येथून ते इतर चार जणांसाेबत संसारपयाेगी साहित्य घेण्यासाठी बहाळ येथे येत हाेते. मालेगाव ते बहाळ हा प्रवास ५५ किलाेमीटरचे असून बहाळ गाव अवघ्या सहा किलाेमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. अपघातात टेम्पाे कलंडली.

त्यामुळे प्रवाशांनी अारडाअाेरड केली. तेव्हा चाळीसगाव येथील रिक्षाचालक याेगेश देशमुख याने जखमी प्रवाशांना बाहेर काढत ग्रामस्थांच्या मदतीने स्वत:च्या रिक्षात दवाखान्यात अाणून साेडले. ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात अाले. त्यात दाेन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने धुळे येथे हलवण्यात अाले. या प्रकरणी पाेलिसात अपघाताची नाेंद करण्यात अाली अाहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.

जखमींची नावे; दाेघे प्रवाशांना जबर मार
हारून अली बाबूअली काझी, नसरीन बी. हारून अली काझी, अब्दुल कादीर अब्दुल लतीफ, शबीना बानाे अब्दुल कादीर, महंमद जाकीर अली काझी, चालक शफीक शेख सलीम हे सहा जण अपघातात जखमी झाले अाहेत. यात अब्दुल कादीर, महंमद अली, हारून काझी हे गंभीर जखमी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हारून काझींचा हात फॅक्चर झाला. तर दाेघांच्या डाेक्याला जबर मार लागला अाहे.

मालेगावला स्थायिक हाेऊन थाटला संसार
हारून काझी हे मूळचे बहाळचेच अाहेत. ते व्यवसायानिमित्त सहा महिन्यांपूर्वीच मालेगावला स्थायिक झाले हाेते. त्यांची मुले बहाळ येथेच राहतात. अपघातात त्यांची पत्नीही गंभीर जखमी झालीय. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली हाेती.

गतिराेधक खराब; रस्त्याचीही लागली वाट
न्हावेगावाजवळ गतिराेधक रस्त्याची वाट लागली अाहे. या रस्त्यावर त्यामुळेच अपघाताची मालिका सुरू अाहे. याच रस्त्यावर अनेक ठिकाणी पाइपलाइनसाठी रस्ता खाेदून ठेवला अाहे. याचा त्रास वाहनधारकांनाच हाेताे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी अाहे. वळणावर समाेरचा रस्ता दिसून येत नाही, त्यातच रस्ता काेरून ठेवला अाहे.
बातम्या आणखी आहेत...