आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: तिहेरी अपघातात 4 जण ठार, 7 जण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- साक्री तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावरील धाडने गावाजवळ आज (मंगळवारी) दुपारी दोन ते अडीच वाजे दरम्यान हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने मोटरसायकल आणि अपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला. जोरदार धडकेमुळे पिकअप व मोटार सायकलने अचानक पेट घेतला आणि आगित दोन्ही अपघातग्रस्त वाहने जाळून खाक झाली.
 
या अपघातात मोटारसायकलस्वार संतोष डांबरे व एकनाथ माळीच (रा. चिकसे) तसेच रिक्षा चालक संतोष मोरे व वसंत अहिरे (रा. धाडने) हे चौघे जण जागीच ठार झाले असून, रिक्षातील वंदना बोरसे, मंगलाबाई गायकवाड, सयाजी पवार, उत्तम बोरसे, जिभाऊ पवार, जंगलू मालाचे, अविनाश बधाने, सर्व रा. धाडने हे प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. 
 
जखमींना साक्री ग्रामीण रूग्णालय आणि धुळे सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पिकअप चालक विश्वास महाले (रा. माहीर) याच्या विरोधात साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...