आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य चौकात कार थरार: अॅक्सिलरेटरवर पाय पडल्याने कारने उडवले 4 जणांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माजी नगराध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन जाेशी (वय७५) हे बुधवारी १२ वाजेदरम्यान अापल्या ह्युंदायी अाय १० या गाडीने पांडे डेअरी चाैकातून अाकाशवाणीकडे जात हाेते. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिग्नल बंद असल्यामुळे वाहने स्वातंत्र्य चाैकात रांगेत उभी हाेती. जाेशी यांनी याठिकाणी गाडी थांबवत असताना त्यांचा पाय चुकून ब्रेकएेवजी अॅक्सिलरेटरवर पडला. त्यामुळे गाडी अचानक रेस हाेऊन ितने समाेरील एक िरक्षा, दाेन कार अािण दुचाकींना फुटबाॅलसारखे उडवले. यात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू अाहेत.
दुपारी १२ वाजता पांडे डेअरी चाैकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे िसग्नल बंद हाेते. त्यामुळे सारे वाहनधारक सिग्नल सुरू हाेण्याची वाट पाहत हाेते. या वेळी पांडे चाैकातून माजी नगराध्यक्ष गजानन जाेशी हे ह्युंदायी अाय१० (क्रमांक एमएच-१९-एपी-३९००) या गाडीने िजल्हाधिकारी कार्यालयाकडे जात हाेते. या वेळी गाडी थांबवत असताना जाेशी यांचा पाय ब्रेकएेवजी अॅक्सिलरेटरवर पडल्याने गाडी अचानक रेस झाली. त्यामुळे गाडी समाेर उभ्या असलेल्या अमर चाैधरी (अाहुजानगर) यांच्या नव्या रिक्षावर अादळल्याने ती फुटबाॅलसारखी फेकली गेली. त्यानंतर कारने रिक्षाच्या पुढे उभ्या असलेल्या स्कुटी (एमएच-१९-एटी-४८३९)ला उडवल्याने संगीता श्रीकांत िवसपुते (वय ३०) अािण श्रीकांत िवसपुते (वय ३८, दाेघे रा. शेंदुर्णी) हे दुभाजकावर फेकले गेले. नंतर गाडीने हाॅटेल रुपालीच्या बाजूला उभ्या असलेल्या अिजत बजुरिया यांच्या मालकीच्या स्काॅडा रॅपिडला (एमएच-१९-एएक्स-८७११), अनिल शेवाळे (रामेश्वर काॅलनी) यांच्या बजाज प्लॅटिना (एमएच-१९-एएल-५१९०), महेश त्यागी (पटेलनगर) यांच्या स्वीफ्ट िडझायरला (यूपी-८०-सीई-६६९०), अॅक्टिव्हा (एमएच-१९-९३),स्कुटी (एमएच-१९-४१६५), प्रकाश माेतिराम बाविस्कर (रा. कुसुंबा) यांच्या बजाज पल्सर (एमएच-१९-बीव्ही-३४९२)ला धडक देत थांबली. ४० मीटर अंतरात दीड मििनटे घडलेल्या थरारात अनेकांच्या काळजाचा ठाेका थांबला हाेता. या अपघातात श्रीकांत िवसपुते, संगीता िवसपुते, संगीता यावलकर, अनिल शेवाळे, प्रकाश बाविस्कर, अमर चाैधरी हे सहा जण जखमी झाले अाहेत.

दरम्यान, याप्रकरणी काेणीही तक्रारदार पुढे अाल्याने रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्यात अालेली नव्हती. याबाबत पाेलिस अधीक्षक डाॅ. जे. डी. सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता; त्यांनी तक्रारदार पुढे येत नसेल तर पाेलिसांना स्वत: तक्रारदार हाेण्याच्या सूचना देण्यात येतील, असे ‘दिव्य मराठी’ शी बाेलताना सांगितले.
परवान्यासाठी फिटनेस अावश्यक
वाहनचालवण्याचा परवाना काढताना िफटनेस सर्टिफिकेटची अावश्यकता असते. वाहन परवान्याला १८ वर्षे वय पूर्ण असण्याची मर्यादा अाहे. त्यामुळे जाेपर्यंत चालक वाहन चालवण्यासाठी तंदुरुस्त अाहे, ताेपर्यंत ताे वाहन चालवू शकताे. त्याला वयाची मर्यादा नाही. सुभाषवारे, उप प्रादेशिक परिवहन अिधकारी