आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या स्वप्नांना पंख देत, तू आता कुठे उडून गेली गं आई, गिरडगावजवळ ट्रकची-अॅपेरिक्षाचा अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई संगीताच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या तिन्ही मुली अनुक्रमे हर्षाली, रुपाली, पल्लवी सोहमने टाहो फोडला. संगीता जाधव (इंसेटमध्ये)
यावल- आमच्या स्वप्नांना पंख देऊन तू कुठे उडून गेली गं आई? असा टाहो फोडून रडणाऱ्या मुलींना पाहून अनेकांचे हृदय पिळले. घरात अठराविश्वे दारिद्रय, पदरी तीन मुली. त्यांनाच अापली संपत्ती मानून भाजीपाला विक्रीतून मुलींना उच्चशिक्षित करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणाऱ्या यावल शहरातील जाधव कुटुंबावर गुरुवारी नियतीने आघात केला. रिक्षाद्वारे धानोरा (ता. यावल) येथील बाजारात जाताना बोअरवेलच्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. या अपघातात संगीता दिलीप जाधव (वय ४५) या जागीच ठार, तर दोघे जखमी झाले.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर गिरडगाव-किनगाव दरम्यानच्या वळणावर गुरुवारी सकाळी ११.१५च्या सुमारास अपघात घडला. यावलकडून चोपड्याकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा (क्रमांक एम.एच.१९-बीयू. १८०१)ला चोपड्याकडून यावलकडे जाणाऱ्या सैफी बोअरवेल चोपडा यांच्या ट्रक (क्रमांक एमएच.१८-झेड.६०५५)ने धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा रस्त्याच्या कडेला फेकली जाऊन त्यात बसलेल्या संगीता दिलीप जाधव (वय ४५, रा.संभाजीपेठ, यावल) यांचा मृत्यू, तर अनिल अशोक जाधव (वय ४२, रा.यावल) सुगराबाई अजित तडवी (वय ५५, रा.मालोद) हे दोन्ही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोन्ही वाहनचालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर घटनास्थळी आलेले एपीआय योगेश तांदळे, सहायक फौजदार रवींद्र साळी यांनी जखमींना उपचार्थ रवाना केले. अनिल जाधव यांच्या फिर्यादीवरून बोअरवेल ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. रवींद्र साळी तपास करीत आहेत.

तुम्ही खूप शिकावं : संगीता-दिलीपया दाम्पत्यास तीन मुली आणि तब्बल १४ वर्षांनंतर एक मुलगा झाला होता. परिसरातील विविध गावांच्या आठवडे बाजारात जाऊन भाजीपाला विक्री करणे हा जाधव परिवाराचा चरितार्थ भागवणारा व्यवसाय. आपण खूप कष्ट करू, मात्र तिन्ही मुलींना उच्चशिक्षण देत सक्षम बनवू, असा निर्धार होता.

अडचणीतून मार्ग : तिन्हीमुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करताना जाधव दाम्पत्यावर कर्जबाजारी होण्याचे प्रसंग ओढवायचे. मात्र, ते कधीही खचले नाही. आपण भोगले मात्र मुलांचे भविष्य घडवू, यासाठी ते दररोज पहाटे वाजेला उठून जळगाव भुसावळ येथे पोहोचून भाजीमार्केटमधून विक्रीसाठी भाजीपाला खरेदी करायचे.

चिमणी, पाखरे हिरमुसली...
संगीताजाधव पतीलादेखील निराश होऊ देता पाठबळ द्यायच्या. याच हिंमतीतून त्यांनी मोठी मुलगी हर्षालीला बीकॉमपर्यंतचे शिक्षण दिले. ती सध्या एम.कॉमला आहे. दुसरी मुलगी रुपाली बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षाला, तर लहान पल्लवी बारावीला आहे. चौथ्या वर्षांचा सोहमला त्यांनी नुकतेच इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीत दाखल केले आहे. आई संगीताच्या मृत्यूने खचलेली त्यांची मुले...तुझी पाखरे आता कशी भरारी घेतील, असे म्हणत हमसून हमसून रडत होती. त्यामुळे अनेकांना हुंदके दाटून येत होते.
बातम्या आणखी आहेत...