आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी गावकऱ्यांनी लुटली दारू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी अपघातग्रस्त ट्रकमधील दारू लुटण्यासाठी झुंबड उडल्याची घटना जळगावात घडली. माणूसकीपेक्षाही दारू प्रिय, असाच हा प्रकार होता. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. 
 
दारूच्या बाटल्यांचे खोके घेऊन जाणारा ट्रक एक्सेल तुटल्याने दुचाकीवर पडला. या अपघातात मृत्यू पावलेल्या तसेच जखमी झालेल्या महिलांची मदत करायचे सोडून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी ट्रकमधून देशीविदेशी दारू लुटली. मयत आणि जखमी महिला रस्त्यावर पडले असताना त्यांना तुडवत गावातील लोकांनी बिअरच्या बाटल्या लुटल्या. भुसावळ यावल रस्त्यावर हा अपघात घडला होता. शेतीकाम आटोपून दुचाकीवर घराकडे निघालेल्या मीराबाई भारंबे (वय 43) यांचा या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात अन्य एक महिला तसेच दुचाकीचालक गंभीर जखमी झाला.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...