आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविराजचा मृत्यू स्वप्निलमुळेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर शिव कॉलनी परिसरातील गायत्री हॉस्पिटलसमोर सोमवारी रात्री वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिंचन विभागाच्या उप अभियंत्याचा मृत्यू झाला होता. या अपघातात स्वप्निल श्यामराव पाटील हा त्याचा मित्रही सोबत होता. कारही त्याचीच आणि तोच चालवत होता. मात्र, पोलिसात मृत अभियंता रविराज गोपाल सैंदाणे (राजपूत) कार चालवत असल्याची नोंद नाही. ही नोंद चुकीची असून गाडी स्वप्निलच चालवत होता. मुलाच्या मृत्यूसाठी तोच जबाबदार असल्याचा आरोप रविराजचे वडील गोपाल भीमसिंग राजपूत (सैंदाणे) यांनी केला आहे.
काय आहेत आरोप?
रविराजगाडीच्या डाव्या बाजूला पडलेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या डाव्या कानाच्या मागे जखम झाली होती. स्वप्नील गाडी चालवत असल्याने गाडीचे स्टेअरिंग त्याच्या हातात असल्याने गाडीच्या बाहेर उडी मारून त्याने स्वत:चा बचाव केला. मात्र, स्वप्निलने पोलिसात फिर्याद देताना रविराज गाडी चालवत असल्याची खोटी माहिती दिली. स्वत:चा बचाव करण्यासाठी तो सत्य लपवत आहे. सर्व पुरावे स्वप्निल विरोधात असताना रविराजची बदनामी करीत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा. माझ्या मुलाच्या मृत्यूला स्वप्नीलच जबाबदार आहे, असा आरोप रविराजच्या वडिलांनी केला आहे.
चौकशीनंतर कारवाई
रविराजचे वडील गोपाल राजपूत यांनी अर्ज दिला आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. ते दोघे कुठून गाडीत बसले, गाडी कोण चालवत होते, कुणी प्रत्यक्षदर्शी आहे का? याची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल. भाऊसाहेबपटारे, पोलिसिनरीक्षक