आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू, यावल-फैजपूर रस्त्यावरील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- शहरातुन फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विचित्र अपघात घडला. या अपघातात चंद्रकांत जगन्नाथ पाटील (वय 63, रा. डोंगरकठोरा) यांचा मृत्यू झाला.

 


शहरातुन फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाविद्यालयाच्या पुढे यावलकडून फैजपूरकडे फरीद खान युनूस खान (रा. यावल) हा दुचाकी (क्र. एम. एच. 19 बी. डब्ल्यु. 4436) वरून जात होता त्यास मोबाईलवर कॉल आल्याने त्याने अचानक वाहन हळू केले तेव्हा मागुन येणाऱ्या दुचाकीने (क्र. एम. एच. 19 बी. ए. 7672) त्यांना धडक दिली. दुसऱ्या दुचाकीवरील चालक चंद्रकांत जगन्नाथ पाटील (वय 63, रा. डोंगरकठोरा) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटना घडताच फरीद खान याने स्वत: पोलिस ठाणे गाठले. पाटील यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. गोविंदा तुळशिराम भंगाळे (रा. चितोडा) यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...