आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक इच्छादेवी चौकात आणखी दोन बळी, संतप्त जमावाची दगडफेक; ट्रकचालकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धोकादायकइच्छादेवी चौकाने मंगळवारी आणखी दोन बळी घेतले. सकाळी साडेआठच्या सुमारास एका ट्रकने मोटारसायकलला उडवले. या अपघातात एका चिमुकलीसह दोन ठार झाले. वळण घेताना ट्रकने धडक दिल्‍यामुळे दुचाकीचालकाचा तोल गेला आणि गाडीवर असलेली चिमुकली आणि ितची काकू ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली. अपघात झाला त्या वेळी इच्छादेवी चौकात प्रचंड वर्दळ होती.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्रकवर दगडफेकही केली. इच्छादेवी पोलिस चौकीत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह चार वाहतूक पोलिसांनी जमावावर िनयंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यामुळे जमावावर नियंत्रण मिळवता आले. दरम्यान, या अपघातामुळे इच्छादेवी चौकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या चौकात दर महिन्यात किमान एक-दोन अपघात होत असतात. या चौकाच्या दोन्ही बाजूंना उतार असल्यामुळे वाहने वेगात येतात. त्यातच गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी ही येथील रोजची समस्या बनली आहे.

दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा
जमावानेट्रकवर दगडफेक करून नुकसान केले. याप्रकरणी बबलू बागवान, आसीफ काल्या, बापू शिंपी, पिंट्या माळी, समशेर उर्फे लंब्या, मुनाफ शहा रज्जाक यांच्यासह इतर ४० जणांवर गुन्हा दाखल झाला.

समांतर रस्ताच हवा
खोटेनगरते कालिंकामाता मंदिरापर्यंतचा ७.२ किलोमीटरचा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. या भागात दुचाकी छोट्या वाहनांना ये-जा करण्यासाठी समांतर रस्ते नसल्यामुळे सर्वांना महामार्गाचाच वापर करावा लागतो. त्यामुळे महिन्यातून एक-दोन अपघात होत असतात. त्यात अनेक नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. मंगळवारी झालेल्या अपघातातील काकू-पुतणी हे समांतर रस्ते नसल्याचेच बळी ठरले आहेत.

अंधश्रद्धेपोटी गेले प्रार्थनास्थळी
याअपघातात मृत पावलेली राधिका ही आजारी होती. तिच्‍यावर डॉक्टरांचे उपचार सुरू असूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे मंगळवारी सकाळी वाजता दुर्गाबाई यांनी चुलतभाऊ अनिलला राधिकाला घेऊन प्रार्थनास्थळी जाण्याचे सांगितले. त्यानुसार राधिकाच्या वडिलांच्या दुचाकीने तिघे जण जळगाव-भुसावळ रोडवरील टीव्ही टॉवरच्या परिसरात असलेल्या प्रार्थनास्थळी गेले होते. तेथील बाबाने त्यांना राधिकाच्या शांतीसाठी बोकड कापण्याचा सल्ला दिला होता. बाबांचा सल्ला आणि आशीर्वाद घेऊन तिघे जण घरी परतण्यासाठी निघाले असतानाच इच्छादेवी चौकात त्यांचा दुर्दैवी अपघात झाला, असे जखमी अनिलने सांगितले.

दुचाकीला मागून धडक
इच्छादेवीचौकातून समतानगरकडे दुचाकी (क्र.एमएच-१९-बीएस-२९५३)वरून अनिल छगन चव्हाण, दुर्गाबाई मनोहर राठोड (वय ३८) राधिका बबलू चव्हाण (वय वर्ष) हे जात होते. अनिलने वळण घेण्यासाठी दुचाकीची गती कमी केली. मात्र, याच वेळी मागून येणाऱ्या ट्रक (क्र.एमएच-०४-एच-४१११)ने दुचाकीला मागून धडक मारली. त्यामुळे दुचाकीचालकाचा तोल गेला दुचाकीचालकासह तिघे जण खाली कोसळले. त्यात दुर्गाबाई आणि राधिका या काकू-पुतणीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला, तर दुचाकीचालक अनिल बाजूला फेकला गेल्यामुळे बचावला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालक मोहंमद नासिर जमिलोद्दीन (वय २४, उत्तर प्रदेश) याला अटक केली.