आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोसळलेल्या पुलावर ट्रक अडकला, वाहतूकित अडथळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मुक्ताईनगरतालुक्यातीलभटुकली नाल्यावरील कोसळलेल्या पुलावर मार्बलची वाहतूक करणारा ट्रक अडकल्याची घटना बुधवारी पहाटे वाजता घडली. यामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.

ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. भटुकली नाल्यावरील जीर्ण पूल कोसळल्याची घटना सप्टेंबरला घडली होती. त्यामुळे पुलावर भराव टाकून दुचाकी आणि रिक्षा यासारख्या वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, बुधवारी पहाटे मार्बलची वाहतूक करणारा ट्रकचालक जयनारायण सिंग (रा. जालोन, उत्तर प्रदेश) याने ट्रक (क्रमांक आरजी- ०९, जीबी-४५१७) कोसळलेल्या पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुल पुन्हा कोळसल्याने ट्रक अडकला. राजस्थान येथून मार्बल घेऊन हा ट्रक हैद्राबादकडे जात होता. या पुलावर आणखी भराव टाकला जाईल.
पुनर्बांधणीसंदर्भात मुख्य अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. पुलाच्या बाजूने वळणरस्ता काढला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता डी.एच. चौधरी यांनी दिली.