आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयसमोर धडकली दोन वाहने; चालक, क्लिनर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आयटीआयसमोर सोमवारी पहाटे वाजता दोन वाहने एकमेकांच्या समोर धडकली. यात एका मालवाहू वाहनाचा चालक क्लिनर जखमी झाला. तर त्यातील टोमॅटोचे नुकसान झाले. सुप्रीम कॉलनी येथे राहणारे जुबेर खान शरीफ खान (वय ३५) हे पिंपळगाव बसमत (जि.नाशिक) येथून मालवाहू वाहनाने (एमएच १९ बीएम ५४६२) टोमॅटो घेऊन जळगावच्या भाजीबाजारात येत होते. तर नागपूर येथून शोरूममधील नवी कोरी चारचाकी घेऊन संदेश घनश्याम भोंगळे (वय ३०, रा.नागपूर) हे नाशिक जाण्यासाठी निघाले होते.
 
ही दोन्ही वाहने आयटीआयसमोर महामार्गावर एकमेकांवर आदळली. यात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. यात जुबेर खान यांच्या बरगड्यांजवळ फ्रॅक्चर झाले. तर क्लिनर इरफान बागवान (वय २२, रा.शाहूनगर) हा किरकोळ जखमी झाला आहे. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...