आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, 12 Years Girl Death In Accident, Divya Marathi

डंपरच्या धडकेने बालिका मृत्युमुखी, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील निमखेडी रस्त्यावरील विठ्ठलवाडीजवळ शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता डंपरने मोटारसायकलस्वाराला समोरून धडक दिली. या अपघातात 12वर्षीय मुलगी ठार झाली, तर तिचे आई-वडील आणि भाऊ हे तिघे गंभीर जखमी झाले.

विठ्ठलवाडीतील रहिवासी चंद्रकांत प्रभाकर पाटील (वय 36) हे शुक्रवारी सायंकाळी मोटारसायकलने आव्हाणे येथे नातेवाइकाच्या साखरपुड्याला जात होते. त्यांच्यासोबत पत्‍नी उज्‍जवला पाटील (वय 33), मुलगी मानसी (वय 12) आणि मुलगा प्रज्वल (वय 7) हेदेखील होते. या वेळी निमखेडीकडे जाणार्‍या चैताली कन्स्ट्रक्शन कंपनीच्या डंपर (क्र.एमएच-19/6213)ने पाटील यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.

त्यात मानसी ही जागीच ठार झाली, तर तिन्ही जण गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डंपरचालक अपघातानंतर पसार झाला आहे. चंद्रकांत पाटील हे ‘मॅग्मा फायनान्स’ कंपनीत वसुलीचे काम करतात.