आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Jamner, Divya Marathi, Examination

परीक्षा संपल्याच्या आनंदाने घेतला बळी; एक गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेले वडील घरी नसताना मोटारसायकल घेऊन जाणे जामनेरमधील अल्पवयीन मुलास सोमवारी चांगलेच महागात पडले. भरधाव मोटारसायकल पुलास धडकल्यामुळे गाडीच्या मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला, तर स्वत: मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाला.


जामनेरमधील प्रतीक शिवाजी बारी (वय 17) याने सोमवारी दहावीच्या पेपरला जाताना वडील घरी नसल्याची संधी साधून हीरोहोंडा मोटारसायकल नेली. पेपर संपल्यावर प्रतीक आपला मित्र विशाल सुधाकर बोदडे याला मोटारसायकलवरून घरी सोडण्यासाठी जात होता. यादरम्यान हिवरखेडा रोडकडील वळणापूर्वी असलेल्या पुलाच्या कठड्याला सुसाट मोटारसायकल धडक ल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या विशालचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात प्रतीक बारी हा गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी जोरात की, पुलाचे दोन कठडे तुटले. विशाल हा डान्स व विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणारा हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. विशालचे वडील सुधाकर बोदडे हे मूळचे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील रहिवासी आहेत. ते बसस्थानकासमोर हातगाडीवर हातरुमाल, पिशव्या आदी वस्तूंची विक्री करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर जखमी प्रतीकचे वडील सोनाळा येथे जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्याध्यापक आहेत. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.