आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Track, Tanker And Hyundai Accident At Jalgaon National Highway

महामार्गावर ट्रक, टँकर व ह्युंदाईचा विचित्र अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव-धुळे महामार्गावर गुरुवारी दिवसभरात खोटेनगर व जैन पाइप कंपनीसमोर वेगवेगळे दोन अपघात झाले. यात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र, टाटा इंडिका व ह्युंदाई या दोघा वाहनांचे मोठे नुकसान झाले.

खोटेनगरजवळ सायंकाळी 5 वाजेदरम्यान ट्रक, टँकर व ह्युंदाई कारमध्ये विचित्र अपघात झाला. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. ट्रक (क्र. एचएच 19 झेड 3068) जळगावकडे येत असताना ट्रकचालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रकच्या पुढे धावणार्‍या ह्युंदाई (क्र. एमएच 19 एडब्ल्यू 9990)ला धडक दिल्याने ह्युंदाई कारपुढे धावणार्‍या टॅँकर (क्र.एमएच 19 झेड 4388)मध्ये घुसली. यात कार आणि टँकरचे नुकसान झाले. या प्रकरणी टॅँकरचालक शेख सालार शेख आमीर याने दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

महामार्गावर सकाळी 7.15 वाजता जळगावहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस (एमएच 40 एन 9099) आणि समोरून येणारी इंडिका (एमएच 10 एएक्स 2868) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात इंडिका चालकाच्या बाजूचे दोन्ही दरवाजे गाडीपासून वेगळे झाले. तसेच चालक व एक प्रवासी दोघेही जखमी झाले आहेत. तर बसचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी बसचालक किशोर चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाळधी औट पोस्टला गुन्हा दाखल झाला आहे.