आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; खान्देशातील बाप-लेकीसह 4 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात चक्काचूर झालेली गाडी. - Divya Marathi
अपघातात चक्काचूर झालेली गाडी.
बाडोली, पाडळसरे- धार्मिक स्थळांचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा गुजरातमधील राजपीपलाजवळ अपघात झाला. या अपघातात जळगाव धुळे जिल्ह्यातील चाैघं भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर अाहे. 
 
जळगावातील अॅड. सुनील पुंडलिक पाटील अापल्या नातेवाइकांसह गुजरातमधील तीर्थयात्रेसाठी बोलाेरेने (एमएच १८ डब्लू ३६३३) १५ अाॅगस्ट राेजी गेले हाेते. साेमनाथ, ज्याेर्तिलिंग, द्वारका, अंबाजी, पावागड येथील दर्शन करून ते साेमवारी महाराष्ट्रात परत येत हाेते. राजपीपला राेडवर तांदलजाजवळ समाेरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या बुलेराे गाडीला धडक दिली. या अपघातात बुलेराेमधील चार जण जागीच ठार झाले. त्यात सुनील पुंडलीक पाटील (वय ३८) त्यांची मुलगी यामिनी सुनील पाटील,(वय १३, रा.वर्डी, ता.चाेपडा, ह.मु.जळगाव) कविता विलास पाटील (वय ३८, रा. नीम, ता.अमळनेर) चालक ज्ञानेश्वर काशिनाथ अहिरे (वय,४२ रा. अर्थे, ता.शिरपूर) यांचा समावेश अाहे. अपघातात शीला सुनील पाटील, कनक सुनील पाटील, उपासना सुनील पाटील, राजनंदिनी विलास पाटील, उदय विलास पाटील विलास लोटन पाटील हे जखमी झाले. 
 
सुनील पाटलांची जिल्हा न्यायालयात वकिली
इंद्रप्रस्थनगरातील अॅड.सुनील पुंडलीक पाटील हे त्यांची पत्नी शिला, मुलगा कनक, यामिनी उपासना या तीन मुलांसह त्यांचे अमळनेर तालुक्यातील निम येथील साडूबराेबर तिर्थयात्रेसाठी गेले हाेते. सुनील पाटील हे जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करतात. त्याचबरोबर इंद्रप्रस्थ नगरात त्यांचे किराणा दुकानही आहे. पत्नी शिला ते दुकान चालवत होते. सुनील यांना मच्छिंद्र, अमितराज, श्याम प्रकाश असे चार भाऊ आहेत. 
 
वाहनाची झाली हाेती चाेरी...
अपघात झालेल्या बाेलेराे वाहनाची चाेरी झाली हाेती. त्यासंदर्भात विलास लाेटन पाटील यांनी शिरपूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु.रं.न. १७७/१३ नुसार १९ जुलै २०१३ राेजी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनंतर वाहन सापडले हाेते. त्याच वाहनाला अपघात झाला अाहे. 
 
विलास पाटलांचा कापसाचा व्यवसाय
अमळनेर तालुक्यातील नीम येथील विलास लाेटन पाटील यांचा कापसाचा व्यवसाय अाहे. त्यांच्या पत्नी बीएड शिक्षणासाठी शिरपूर येथे अाल्या हाेत्या. तेव्हापासून ते अापल्या परिवारासह बन्सीलाल नगरात भाड्याच्या घरात राहत हाेते. पत्नीचे शिक्षण पूर्ण हाेऊन नुकत्याच त्या किसान विद्याप्रसारक संस्थेत नाेकरीला लागल्या हाेत्या. 
 
निम गावात चूल पेटली नाही 
बैलपोळ्याची तयारी निम गावात सुरू हाेती. शेतकरी बैलांना रंगरंगाेटी करत हाेते. तेव्हा अपघाताचे वृत्त गावात अाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोळाही साजरा केला नाही. घटनेचे वृत्त कळताच लोटन नारायण पाटील मघन वामन पाटील यांच्यासह २० ते २५ ग्रामस्थांसह घटनास्थळाकडे रवाना झाले. 
बातम्या आणखी आहेत...