आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर अन् कारला धडकली एसटी..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आकाशवाणी चौकाकडे जाणार्‍या ट्रेलर (क्र. एमएच 04 डीएस 317) ला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या कार (क्र.एमएच 19 बीजे 5962) ला एसटीने जोरदार धडक दिली. ही घटना रविवारी दुपारी 5 वाजता इच्छादेवी चौफुलीजवळ घडली.
एसटीच्या दरवाजाची मोडतोड
मंगरूळपीर डेपोची अकोला-जळगाव एसटी (एमएच 40 वाय 5566) ट्रेलरच्या उजव्या बाजूला जोरात धडकली. त्यामुळे एसटीच्या डाव्या बाजूकडील कॅबिनपासून ते थेट दरवाजापर्यंतचा पत्रा कापला गेला.
दरवाजा तोडून काढले प्रवाशांना
आसारीच्या ट्रेलरला एसटी धडकल्याचे पाहून प्रवासी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे प्रत्येक जण गाडीबाहेर पडण्यासाठी धडपडत होता. या वेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी 20 प्रवाशांना एसटीचा दरवाजा तोडून शिडी लावून बाहेर काढले.
ट्रेलर, एसटीचालक झाले पसार
ट्रेलर व कारमध्ये घुसलेली एसटी नागरिक काढत असताना ट्रेलर व एसटीचा चालक पसार झाले होते. कारचालक पंकज मेतकर यांच्या फिर्यादीवरुन एसटीचालक विनोद चव्हाण याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
05 वाहतूक पोलिसांनी इच्छादेवी मंदिरासमोरील महामार्गावर दोन्ही बाजूला खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली
45 मिनिटे अपघातामुळे महामार्गावर अजिंठा चौफुली व आकाशवाणी चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताची छायाचित्रे..