आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रिलने छिद्रे पाडताना सिद्धार्थ कंपनीत स्फाेट; दाेघे भाजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमअायडीसीतील सिद्धार्थ कार्बाेकेम कंपनीत साेमवारी दुपारी १२ वाजता कर्मचारी ड्रिल मशीनने छिद्रे पाडत असताना ठिणगी केमिकलच्या बॅरलवर पडल्याने स्फाेट झाला. यात दाेन कामगार गंभीररीत्या भाजले गेले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहेत. दरम्यान, दीड महिन्यापूर्वीही याच कंपनीत झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला हाेता.
एमअायडीसीतील रेमंड कंपनीच्या बाजूला असलेल्या सेक्टर ‘ई’ मधील प्लाॅट क्रमांक मधील सिद्धार्थ कार्बाेकेम प्राॅडक्ट लिमिटेड कंपनीत साेमवारी दुपारी १२ वाजता वरच्या मजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरू हाेते. फिटर युनूस अहमद शेख (वय ४०, रा. भुसावळ) हा ड्रिल मशीनने छिद्रे पाडत असताना ठिणगी रॅक्टर केमिकलचे बॅरलवर पडली. त्यामुळे केमिकलने क्षणात पेट घेऊन त्याचा स्फाेट झाला. यात युनूस अाणि त्याच्या बाजूला उभे असलेले दिलीप किसन बाेरनारे (वय ४५) यांच्या अंगावर केमिकल उडाल्याने ते गंभीररीत्या भाजले. स्फाेटाचा अावाज अाल्यानंतर कंपनीतील इतर कामगार धावत गेले. त्यांनी अाग विझवण्याच्या सिलिंडरने अाग विझवली. त्यानंतर दाेन्ही कामगारांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यात युनूस शेख ५० टक्के तर दिलीप बाेरनारे ७५ टक्के भाजले अाहेत.

माहिती देण्यास नकार
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी कंपनीत माहिती घेण्यासाठी दाखल झाले. त्या वेळी सुरुवातीला अशा प्रकारची घटनाच घडली नसल्याचे कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात अाले. मात्र, काही वेळानंतर त्यांनीच हा प्रकार घडल्याचे सांगितले. त्यानंतर घटना कशामुळे घडली हेसुद्धा सांगण्यास टाळाटाळ केली. कंपनीच्या वतीने काेणीही जबाबदार अधिकारी बाेलण्यासाठी उपलब्ध नव्हता. व्यवस्थापक एस. एस. मनियार यांच्याशी माेबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बाेलण्याचे टाळले.
सिद्धार्थ कार्बाेकेम कंपनीतील इलेक्ट्रिशियन राहुल वासुदेव चाैधरी (वय ३१, मूळ रा. साळवे, ता. धरणगाव, ह. मु. रामेश्वर काॅलनी) हा अाॅगस्ट राेजी दुपारी १२ वाजता कंपनीच्या अातल्या बाजूने छतावर काम करत हाेता. त्या वेळी त्याचा ताेल जाऊन ताे खाली पडला. त्याला तत्काळ गणपती मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात अाले. मात्र, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. त्याच्या डाेक्यात साधे हेल्मेटसुद्धा नव्हते.
बातम्या आणखी आहेत...